नंदुरबारात दीड लाख कुटुबांच्या हाताला काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 12:52 PM2017-12-08T12:52:11+5:302017-12-08T12:52:19+5:30
‘नरेगा’ : तीन वर्षाची आकडेवारी, वर्षात मजुरीपोटी 110 कोटींची रक्कम अदा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रोजगार हमी योजनेतून (नरेगा) गेल्या तीन वर्षात 1 लाख 47 हजार 371 कुटुंबियांच्या हाताला काम मिळाले आह़े त्याच प्रमाणे या कुटुंबियांसाठी 110 कोटी 66 लाख रुपयांची रक्कम मजुरीपोटी अदा करण्यात आली आह़े एकीकडे अकुशल निधी खर्च होत असताना दुसरीकडे मात्र कुशल निधीसाठी जिल्हा प्रशासनाला अद्यापही प्रतिक्षा करावी लागत असल्याची माहिती आह़े
या योजनेअंतर्गत वर्षातील 100 दिवस केंद्र सरकारतर्फे तर उर्वरीत 265 दिवस राज्य सरकारतर्फे स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन दिला जात असतो़ पूर्वी या कामासाठी प्रतिव्यक्ती 192 रुपये मजुरी दिली जात होती़ परंतु आता ती वाढवून 201 रुपये करण्यात आली आह़े
दरम्यान, नरेगाअंतर्गत 2015-2016 मध्ये 4 हजार 610, 2016-2017 मध्ये 4 हजार 548 तर 2017 च्या नोव्हेंबर्पयत एकाच वर्षी तब्बल 9 हजार 950 अशी एकूण 19 हजार 108 कामे पूर्ण झाले आहेत़
दीड लाख कुटुंबियांच्या
हाताला काम
योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे दीड लाख कुटुंबियांच्या हाताला काम मिळाले आह़े 2015-2016 वर्षात 47 हजार 823, 2016-2017 वर्षात 55 हजार 87 तर नोव्हेंबर 2017 र्पयत 44 हजार 461 कुटुंबियांच्या हाताला काम मिळाले आह़े
त्याच प्रमाणे वरील वर्षात अनुक्रमे 37 कोटी 72 लाख, 46 कोटी 57 लाख व 26 कोटी 37 लाख असा एकूण 110 कोटी 66 लाख रुपयांचा अकुशल निधी मजुरीपोटी वाटप करण्यात आला आह़े
नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात मजुरांमध्ये बेरोजगारीची मोठी समस्या आह़े त्यामुळे अशांना जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शन करुन त्याना रोजगार हमी योजनेबाबत माहिती दिली जात़े त्याच प्रमाणे त्यांना रोजगार उपलब्ध करुन अकुशल निधीचे मजुरीपोटी वाटप करण्यात येत असत़े
ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात मजुरांचे मार्गदर्शनाअभावी स्थलांतर होत असत़े मजुरांचे गुजरात, मध्यप्रदेशात रोजगारासाठी होणा:या स्थलांतरात मोठी वाढ झाली आह़े त्यामुळे त्यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत स्थानिक परिसरातच रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आव्हाण जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाले आह़े
जिल्ह्यात मजुरीचा प्रश्न गेल्या काही वर्षात वाढत आह़े कुटुंबियांना आपला घराचा गाडा ओढतांना मोठय़ा प्रमाणात कसरत करावी लागत असत़े परंतु गेल्या जिल्हा प्रशासनाच्या पाठपुराव्याने नरेगांतर्गत हाताला काम मिळू लागले असल्याने स्थानिक मजुरांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आह़े मागेल त्याला काम या तत्वावर मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात जिल्हा प्रशासन सकारात्मक भुमिका पार पाडत असल्याचे दिसून येत आह़े
गेल्या तीन वर्षात योजनेअंतर्गत 19 हजार 108 कामे पूर्ण झाले आहेत़ त्यात विविध रस्ते, सिंचन विहिरी, शौचालये आदींचे कामे पूर्णत्वास येत असतात़
नरेगासाठी केंद्र व राज्य असे दोन्ही सरकारांकडून ठरविक दिवसांच्या रोजगारापोटी असलेल्या निधीची तरतुद करण्यात आले आह़े परंतु काही प्रमाणात केंद्राकडून निधी येण्यास विलंब होत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली़