नंदुरबार : नंदुरबार जिल्हा काँगेसचा बालेकिल्ला राहिला आह़े यामुळे येत्या विधानसभा आणि निवडणूकीत एकजुटीने काम करत बालेकिल्ल्यावर काँग्रेस ध्वज फडकावण्यासाठी कार्यकत्र्यानी सज्ज व्हावे असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा उत्तर महाराष्ट्र विभागाचे सहप्रभारी चेल्ला वामशी चांदरेड्डी यांनी केल़े शहरातील बाजार समिती आवारात त्यांच्या उपस्थित काँग्रेस कार्यकत्र्याचा मेळावा घेण्यात आला़ यावेळी माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावीत, आमदार क़ेसी़पाडवी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रजनी नाईक, माजीमंत्री अॅड़पद्माकर वळवी, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील, धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्यामकांत सनेर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड़ राम रघुवंशी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा हिरा पाडवी, प्रकाश सोनवणे, प्रा़ वाय़जी़ पाटील यांच्या जिल्हा आणि तालुकास्तरावरचे पदाधिकारी उपस्थित होत़े मेळाव्यात चांदरेड्डी यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांच्याकडून आढावा घेण्यात आला़ यात कार्यकत्र्यानी बूथ, ब्लॉक आणि मंडळनिहाय केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला़ प्रामुख्याने मतदार नोंदणी आणि पक्षाच्या धोरणांच्या प्रचार प्रसारावर चर्चा झाली़ सचिव चांदरेड्डी यांनी नुकतीच तीन राज्यात काँग्रेस पक्षाला सत्ता प्राप्त झाली आह़े हे यश महत्त्वाचे असून येत्या वर्षात होणा:या निवडणूकांसाठी सर्वानीच सज्ज राहण्याचे आवाहन केल़े काँग्रेसच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींनी कार्यकत्र्याकडून आढावा घेत माहिती सादर केली़
काँग्रेसच्या मेळाव्यात पदाधिका:यांनी घेतला निवडणूक तयारीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 1:04 PM