पाण्यासाठी द:याखो:यात पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 11:50 AM2019-06-07T11:50:46+5:302019-06-07T11:50:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील काठी ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या पाडय़ांवरील हातपंप आटल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील काठी ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या पाडय़ांवरील हातपंप आटल्याने ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. येथील ग्रामस्थांना नदी-नाल्यात ङिारे तयार करून डोंगरद:यातील चढउताराच्या पायवाटेने पायपीट करून पाणी आणावे लागत आहे.
काठी ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या माथाउखली व वाघडोंगरमाळ येथील हातपंप बंद तर पिपलाटेबा व सिसमपाडातील दोन पैकी एक हातपंप आटल्याने प्रत्येकी एकच हातपंप सुरू आहे. पिपलाटेबा, माथाउखली व वाघडोंगरमाळ येथील ग्रामस्थांना दोन किलोमीटर अंतरावरून भटकंती करीत मोलगीच्या उखलीपाडा येथील ङिा:यातून पाणी पिण्यासाठी आणावे लागत आहे. तर वाघडोगरामाळ व माथाखुली पाडय़ावरील नागरिकांना लिबीपाडा व लोगवाईबारपाडा जवळील दरीतील डोंगरभाग उतरून नाल्यातील पाणी आणावे लागत आहे.
पिपलाटेबा येथील दोन हातपंपापैकी एक बंद तर माथाउखली येथे एक हातपंप असून तोदेखील बंदवस्थेत आहे. तसेच वाघडोगरमाळपाडा येथे दोन हातपंप आहेत. मात्र हे दोन्ही हातपंप बंद असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सिसमपाडा येथे दोन हातपंप असून त्यातील एक बंद तर एक जेमतेमच सुरू आहे. पाण्याची पातळी खोलवर गेल्याने हे हातपंप बंद पडले आहेत. पिपलाटेबा, बारीलिबी, भांग्रापाणी शिवार, माथाउखली, वाघडोंगरमाळ, सिसमपाडा, मंदीरपाडा, राऊतपाडा या गावपाडय़ांवर पाणीटंचाई भासत असल्याने पिण्याच्या पाण्याची सोय करण्याकामी दोन ते तीन हातपंप मंजूर ते तातडीने कार्यान्वित करण्याची गरज आहे. तसेच वाघडोंगरमाळ व माथाउखली येथे टँकरची व्यवस्था करण्यासाठी काठी ग्रामपंचायतीने 8 मार्च 2019 रोजी मोलगी येथे पाणीटंचाई संदर्भातील बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक व गटविकास अधिकारी अक्कलकुवा यांना मागणीचे निवेदन दिले होते. मात्र अद्यापर्पयत पाणीटंचाई निवारणार्थ कुठल्याही प्रकारे उपाययोजना झालेल्या नाहीत. येथील पाणीटंचाई दूर करण्याकामी उपाययोजना करण्याची मागणी काठी ग्रामपंचायतीच्या सरपंच स्नेहा जितेंद्र पाडवी यांनी केली आहे.