लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गणेशोत्सवानंतर आता नंदुरबारात वेध लागले आहे ते दुर्गोत्सवाच़े यंदाच्या दुर्गोत्सवात जरी कलर व डायमंड सजावटीवर मूर्तीकारांकडून अधिक भर देण्यात येत आह़े त्यासाठी भाविकांच्या खास मागणीनुसार देवीच्या मूर्तीची सजावट करण्यात येत असल्याचे सांगण्यात आल़े 21 सप्टेंबरला घटस्थापना होत आह़े त्यामुळे देवीच्या मूर्तीला आकार व तयार झालेल्या मूर्ती सजविण्यासाठी मूर्तीकार व कारागीर दोघेही जोरदार कामाला लागले आह़े गणेशोत्सवानंतर लागलीच दुर्गोत्सवाचे वेध लागत असतात़ त्यात मूर्तीना आकार देणे, रंगकाम करणे, सजावट करणे आदींना विशेष महत्व असत़े त्यासोबतच भाविकांच्या मागणीनुसार यंदा मूर्तीना विविध प्रकारे सजविण्यातही येत आह़े यात, प्रामुख्याणे जरीकलर, मेटॅलिक कलर तसेच डायमंडव्दारे करण्यात येत असलेल्या सजावटीला विशेष मागणी आह़े काही भाविकांकडून प्रत्येक्ष कारागिरासोबत थांबून मूर्तीला सजविण्यात येत आह़े शहरासह जिल्ह्यात सुमारे 400 ते 500 मूर्ती तयार करण्यात आल्या आह़े यात ग्रामीण भागातून मूर्ती नेणा:यांची संख्या मोठी आह़े यंदा दुर्गोत्सवासाठी विविध प्रकारच्या मूर्ती उपलब्ध आहेत़ यात, अष्टभूजा, दुर्गामाता, अंबेमाता, सप्तश्रृंगी, महाकाली आदी देवीच्या रुपातील मूर्तीना मोठय़ा प्रमाणात मागणी आह़े 5 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी नंतर लगोलग मूर्तीकार देवीची मूर्ती घडविण्यासाठी लागत असतात़ फारच कमी कालावधी असल्याने यात मूर्तीकार व कारागिरांची मोठी धावपळ होत असत़े जवळपास सर्वच मूर्तीचे काम पूर्ण झाले असून केवळ सजावटीच्याच कामांना आता वेग देण्यात येत आह़े
यंदा डायमंड सजावट वेधतेय लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 11:38 AM