14 शाळां ठरल्या यंदा शंभर नंबरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 11:54 AM2019-06-09T11:54:26+5:302019-06-09T11:56:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : 100 टक्के निकालाच्या शाळांची संख्या देखील यंदा कमी झाली आहे. गेल्या वर्षी 17 शाळांचा ...

This year, the number of schools has increased from one hundred to one hundred | 14 शाळां ठरल्या यंदा शंभर नंबरी

14 शाळां ठरल्या यंदा शंभर नंबरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : 100 टक्के निकालाच्या शाळांची संख्या देखील यंदा कमी झाली आहे. गेल्या वर्षी 17 शाळांचा निकाल 100 टक्के होता. यंदा 14 शाळांचा निकाल 100 टक्के आहे. 
जिल्ह्यातील 100 टक्के निकाल लावणा:या शाळांचेही कौतूक होत आहे. जिल्ह्यातील 14 शाळांनी 100 टक्के निकाल लावला आहे. या शाळांमध्ये मोलगी येथील माध्यमिक आश्रम शाळा, वेली, ता.अक्कलकुवा येथील वेलीमाता पोस्ट बेसीक आश्रम शाळा. करंजी, ता.नवापूर येथील फिलाडेल्फीया मिशन स्कूल. त:हाडीबोरद, ता.तळोदा येथील एम.डी.सोनवणे आदिवासी माध्यमिक आश्रम शाळा. तळोदा येथील नेमशुशील विद्यालय. आमलाड, ता.तळोदा येथील गौरव सेकंडरी इंग्लिश मेडियम स्कूल. काझीपूर, ता.तळोदा येथील एस.ए.मिशन इंग्लिश मिडियम स्कूल. म्हसावद , ता.शहादा येथील उर्दू माध्यमिक विद्यालय. चिंचपाडा येथील इम्यानूल पब्लीक स्कूल. देवमोगरा, ता.नवापूर येथील आदर्श विद्यालय. पथराई, ता.नंदुरबार येथील के.डी.गावीत इंग्लिश मेडीयम स्कूल, नटावद, ता.नंदुरबार येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा. नळवे, ता.नंदुरबार येथील भाग्य चिंतन माध्यमिक विद्यालय. 
सुरवानी, ता.धडगाव येथील अनुदानीत माध्यमिक पोस्ट बेसीक आश्रमशाळा. या शाळांचा समावेश आहे.
जिल्ह्यात एका शाळेचा शुन्य टक्के निकाल लागला आहे. मलोणी, ता.शहादा येथील माध्यमिक विद्यालय मलोणी या शाळेत एकुण सात विद्यार्थी प्रविष्ठ होते. सातही विद्याथ्र्यानी परीक्षा दिली होती. पैकी एकही विद्यार्थी उत्तीर्ण झाला नाही. त्यामुळे शाळेचा शून्य टक्के निकाल लागला आहे. शाळेचा निकाल शून्य टक्के लागण्याचे कारण मात्र समजू शकले नाही. ही शाळा नवीनच सुरू झाल्याचे बोलले जात आहे. 
 

Web Title: This year, the number of schools has increased from one hundred to one hundred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.