क्षमागुण अंगीकारण्याचा योग म्हणजे पर्युषण पर्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:35 AM2021-09-14T04:35:36+5:302021-09-14T04:35:36+5:30

तळोदा : क्रोध, मान, माया, लोभ यांपासून स्वत:ला परावृत्त करीत क्षमा गुण अंगीकारण्याचा योग म्हणजे पर्युषण पर्व होय. या ...

The yoga of accepting forgiveness is the festival of persecution | क्षमागुण अंगीकारण्याचा योग म्हणजे पर्युषण पर्व

क्षमागुण अंगीकारण्याचा योग म्हणजे पर्युषण पर्व

Next

तळोदा : क्रोध, मान, माया, लोभ यांपासून स्वत:ला परावृत्त करीत क्षमा गुण अंगीकारण्याचा योग म्हणजे पर्युषण पर्व होय. या पर्वाला जैन धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पर्युषण पर्व सप्ताहाची सांगता रविवारी करण्यात आली. या वेळी तळोदा शहरात समापण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास स्वाध्याय तिरपातूर येथून ललित कवाड आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. जैनधर्मीय विविध धार्मिक अनुष्ठानांचे आयोजन करीत आहे. विशेष म्हणजे कोरोना संकटकाळामुळे संतांचे आशीर्वाद प्राप्त करीत घरीच ध्यान, साधना व प्रार्थना पूर्ण करीत असतात. जैन धर्मीयांच्या श्वेतांबर पंथाअंतर्गत भगवान महावीरांनी दिलेल्या अनमोल वचनांचे व उपदेशांचे वाचन, अनुकरण व पालन केले जाते. या आठ दिवसांत प्राप्त केलेल्या सत्कर्माच्या बाबीवरच वर्षभर जैन धर्मीय जीवनयापन करीत असतात. यासाठी जैन मुनींचे व संतांनी दिलेल्या वचनांचे पालन केले जाते. पर्युषण पर्वात उपवास, नवकारसी, पतीकमन, प्रार्थना याला विशेष महत्त्व आहे. या सप्ताह समारोपप्रसंगी शहरातील दिव्यांग संघटनेचे मंगल जैन यांचे जैन संघाकडून अभिनंदन करण्यात आले. या वेळी कीर्तीकुमार शहा, दिलीप सेठिया, गौतम जैन, धनराज पारख व सहकारी उपस्थित होते.

जैन धर्माच्या मुख्य तत्त्वावर चालण्याचा मार्ग

हिंदू धर्मातील नवरात्रीप्रमाणेच मानला जाणारा हा उत्सव जैन धर्माचं मुख्य तत्त्व अहिंसेवर चालण्याचा मार्ग दर्शवतो. या उत्सवाच्या काळात जैनधर्मीय नागरिक संपूर्ण जगासाठी प्रार्थना करतात आणि आपल्याकडून झालेल्या चुकांबद्दल दिलगिरी व्यक्त करतात. पावसाळ्यात साजरा होणारं हे पर्युषण पर्व समाजाला निसर्गासोबत जोडण्याचं प्रशिक्षण देतो. या उत्सवात जैन समाजातील बांधव संपूर्ण भक्तिभावाने धार्मिक उपवास करतात.

Web Title: The yoga of accepting forgiveness is the festival of persecution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.