नंदुरबार : मोदी सरकार सर्वच पातळींवर अपयशी ठरले आहे. केवळ बोलघेवडेपणा त्यांच्याकडे शिल्लक आहे. तो आता उघड झाल्याने भावनिक आवाहनाद्वारे जनतेचे लक्ष विचलीत करण्याचा प्रय} सुरू असल्याची टिका युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद यादव यांनी केली. युवक क्रांती यात्रेनिमित्त ते नंदुरबारात आले होते. युवक काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर काढलेली युवक क्रांती यात्रेचे शुक्रवारी सायंकाळी नंदुरबारात आगमन झाले. यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. दिनदयाल चौकात आयोजित सभेत विविध वक्त्यांनी मोदी आणि फडणवीस सरकारवर आरोप केला. यावेळी केशवचंद यादव यांच्यासह राष्ट्रीय उपाध्यक्ष विधी श्रनिवास, युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रभारी प्रतिभा रघुवंशी, प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, मनिष चौधरी, क्रिष्णा अल्वीवरू, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.राम रघुवंशी, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत, आमदार अॅड.के.सी.पाडवी, माजी आमदार पद्माकर वळवी, सातपुडा कारखान्याचे अध्यक्ष दिपक पाटील, आदिवासी साखर कारखान्याचे अध्यक्ष शिरिष नाईक, माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना केशव यादव म्हणाले, लाटेवर स्वार होत मोदी सरकार सत्तारूढ झाले. मोठमोठय़ा घोषणा केल्या परंतु एकही पुर्ण करण्यात आली नाही. लोकांचे पैसे घेवून मल्ल्या, मोदी पळून गेले. बँका बुडाल्या, नोटबंदीत भाजपने आपले हित साध्य करून घेतले. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला नाही. प्रत्येकाच्या खात्यात पैसे टाकणार होते कुठे गेले. महागाई प्रचंड वाढली. सर्वच बाबतीत अपयशी ठरलेले सरकार आता राम मंदीराचा मुद्दा उकरून काढून लोकांचे लक्ष विचलीत करीत असल्याचा आरोप यादव यांनी केला. युवक काँग्रेसतर्फे क्रांती यात्रेनिमित्त केंद्र आणि राज्य सरकारचे अपयश लोकांसमोर आणले जात असल्याचे त्यांनी सांगितले. उपाध्यक्ष श्रनिवास यांनी राफेल विमान खरेदीत झालेला भ्रष्टाचार लपविण्यासाठी मोदी सरकार खोटे बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्र प्रभारी प्रतिभा चौधरी यांनी देखील टिका केली. प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी राज्यातील युवक काँग्रेसची फळी मजबूत असून तळागाळार्पयतच्या लोकांची कामे केली जात आहेत. त्यामुळे येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला नक्कीच यश मिळेल असे त्यांनी सांगितले. माजी आमदार अॅड.पद्माकर वळवी यांनी देखील मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अॅड.राम रघुवंशी यांनी केले. ते म्हणाले, गेल्या पाच वर्षातील केंद्र व राज्य सरकारच्या नेतृत्वाने युवकांची निराशा केली आहे. युवकांना काँग्रेसने दिशा देण्याचा प्रय} केला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची युवकांविषयीची दूरदृष्टीमुळेच देशाने प्रगती केली असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचलन प्रा.डॉ.माधव कदम यांनी केली. सभेच्या शेवटी राफेल विमान घोटाळाच्या पाश्र्वभुमीवर पुठ्ठयाचे विमान व त्यात मोदी आणि अमित शहा हे बसलेले असल्याचे दाखविण्यात आले आहे. ते विमान यावेळी प्रतिकात्मक रित्या दाखविण्यात आले.
आश्वासनांना कंटाळलेला युवक रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 11:33 AM