जिल्हा परिषद निवडणूकीची तयारी वेगात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 12:21 PM2019-10-30T12:21:00+5:302019-10-30T12:21:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रशासनाकडून जिल्हा परिषद निवडणूकीच्या तयारीला वेग देण्यात आला असून गट व गणनिहाय मतदार याद्यांचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रशासनाकडून जिल्हा परिषद निवडणूकीच्या तयारीला वेग देण्यात आला असून गट व गणनिहाय मतदार याद्यांचे विभाजन पूर्ण करण्यात आले आह़े विभाजित याद्या बुधवारी दुपारी निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार आहेत़
विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता संपल्याच्या दुस:याच दिवशी राज्य निवडणूक आयोगाने नंदुरबारसह राज्यातील चार जिल्हा परिषदेच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत मतदारयाद्यांचे विभाजन करण्याचे आदेश काढले होत़े यानुसार 30 ऑक्टोबर ही मुदत देण्यात आली आह़े जिल्ह्यात 56 जिल्हा परिषद गट आणि 112 पंचायत समिती गण यांचे आरक्षण काढण्यात आले आह़े याअनुषंगाने विधानसभा निवडणूक कार्यक्रमात अंतिम करण्यात आलेली 4 ऑक्टोबर रोजीची पुरवणी मतदार यादीच जिल्हा परिषदेसाठी अंतिम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आह़े जिल्हा प्रशासनाकडून तालुकानिहाय आदेश देण्यात आल्यानंतर मतदार याद्या विभाजनाचे काम तहसील स्तरावर पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आह़े
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम येत्या महिन्यात लागू होण्याची शक्यता असल्याने तालुका स्तरावरुन प्रशासनाची तयारी सुरु झाल्याची माहिती देण्यात आली आह़े
जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या आरक्षणाबाबत हरकती दाखल करण्यात आल्या होत्या़ यातील काही हरकती निकाली निघाल्याची माहिती आह़े परंतू नागरिकांच्या मागास प्रवर्गाबाबत हरकत कायम असल्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आह़े या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आह़े न्यायालयाने राज्यशासनाकडून नागरिकांच्या मागास प्रवर्गातील लोकसंख्येची माहिती मागितली होती़ शासनाकडून ही माहिती बुधवारी सादर झाल्यानंतर तात्काळ निवडणूका घोषित होण्याची शक्यता आह़े