जिल्ह्यात आढळले १ हजार ४१९ रुग्ण; मृतांचा आकडा वाढून पोहचला ९९१वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 08:36 PM2020-09-09T20:36:10+5:302020-09-09T20:45:16+5:30
बुधवारी दिवसभरात जिल्हयात १ हजार ४५३ संशियत रु ग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यापैकी १ हजार १७७ रु ग्ण शहरातील आहे.
नाशिक : जिल्ह्याची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागली आहे. बुधवारीसुध्दा (दि.९) जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा आलेख चढताच राहिला. दिवसभरात १ हजार ४१९रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण रु ग्णसंख्या ४७ हजार ७४४ इतकी झाली आहे. सोमवारपासून जिल्ह्यात उपचारार्थ दाखल रुग्णांचा मृत्यू होण्याचेही प्रमाण वाढले आहे. मंगळवारी २० तर बुधवारी १८ रुग्ण दगावल्याने बळींचा एकूण आकडा ९९१वर पोहचला आहे. दिवसभरात ५६२ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील नऊ,ग्रामिणमध्ये आठ तर मालेगावातील एका रुग्णांचा समावेश आहे.
मागील दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. सण-उत्सवाच्या काळापासून कोरोनाग्रस्तांचा आलेख उंचावत असून अद्याप घसरण होत नसल्याने प्रशासनही चिंतेत सापडले आहे. बुधवारी दिवसभरात जिल्हयात १ हजार ४५३ संशियत रु ग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यापैकी १ हजार १७७ रु ग्ण शहरातील आहे. शहराची कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ३२ हजार ८९३ झाली आहे, तर ग्रामिणचा कोरोनाबाधितांचा आकडा ११ हजार ६२८ इतका झाला आहे. शहरात आतापर्यंत २६ हजार ८८६ रुग्ण तर ग्रामिणमध्ये ८ हजार २८० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मालेगाव मनपा हद्दीत एकूण रुग्णसंख्या २ हजार ९७७ इतकी असून त्यापैकी २ हजार २६३ रुग्ण बरे झाले आहेत. बुधवारी शहरात एकूण ९७२, ग्रामिणमध्ये ४१३ तर मालेगावात ३४ नवे रुग्ण आढळले. शहरासह जिल्ह्याच्या ग्रामिणमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढता वाढत असल्याने गाव, तालुकापातळीवरसुध्दा नागरिकांनी अधिकाधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३७ हजार ६३९ रुग्ण बरे झाले आहेत तर ९ हजार ११४ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. १ हजार ९५० रुग्णांचे नमुना चाचणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.