लोकमत न्युज नेटवर्कयेवला : तालुक्यातील १० संशयितांचे कोरोना अहवाल रविवारी (दि. २३) पॉझीटीव्ह आले आहेत. तर नासिक जिल्हा रूग्णालयात शहरातील पांडूरंग नगरातील ६७ वर्षीय बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून तालुक्यातील कातरणी येथील एक बाधित पुरूष कोरोनामुक्त होवून घरी परतला आहे.रविवारी (दि. २३) आरोग्य यंत्रणेने बाधितांच्या संपर्कातील १३ संशयितांच्या रॅपीड अॅटीजेन टेस्ट घेतल्या असता त्यात १० अहवाल पॉझीटीव्ह तर ३ निगेटीव्ह आले आहेत. बाधितांमध्ये येवला शहरातील खत्री गल्लीतील ७६ वर्षीय, ५३ वर्षीय, २१ वर्षीय पुरूष, ७२ वर्षीय महिला आणि शिंपी गल्लीतील ६६ वर्षीय महिला यांचे कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आले आहे. तर तालुक्यातील आंबेगाव येथील ३२ वर्षीय, ३४ वर्षीय पुरूष, अंदरसूल येथील ४७ वर्षीय पुरूष, ६० वर्षीय महिला व १४ वर्षीय मुलीचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे.तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ३०६ झाली असून आजपर्यंत २४३ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत २३ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला बाधित अॅक्टीव्ह रूग्ण संख्या ४० असल्याची माहिती कोरोना नोडल अधिकारी डॉ. आनंद तारू यांनी दिली.
येवल्यातील १० अहवाल पॉझीटीव्ह एकाचा मृत्यू ; एक झाला कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 9:16 PM
येवला : तालुक्यातील १० संशयितांचे कोरोना अहवाल रविवारी (दि. २३) पॉझीटीव्ह आले आहेत. तर नासिक जिल्हा रूग्णालयात शहरातील पांडूरंग नगरातील ६७ वर्षीय बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून तालुक्यातील कातरणी येथील एक बाधित पुरूष कोरोनामुक्त होवून घरी परतला आहे.
ठळक मुद्देआरोग्य यंत्रणेने बाधितांच्या संपर्कातील १३ संशयितांच्या रॅपीड अॅटीजेन टेस्ट घेतल्या