अकरावीसाठी १० हजार ४०५ जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 10:30 PM2020-08-18T22:30:49+5:302020-08-19T00:53:02+5:30
ंमालेगाव : तालुक्यातून दहावीचे १३ हजार ४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, अकरावीसाठी तालुक्यात केवळ १० हजार ६४० जागा आहेत. त्यामुळे दोन हजार ४०५ विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेशाचा प्रश्न उपस्थित होणार आहे. साहजिकच अकरावीसाठी तालुक्याबाहेरील महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

प्रवेशप्रकिया सुरू झाल्याने विद्यार्थीमहाविद्यालयांमध्ये गर्दी करत आहेत. नाशिक शहरवगळता जिल्ह्यासाठी अकरावी प्रवेशप्रक्रिया आजपासून सुरू झाली असून, बेस्ट आॅफ फाइव्हच्या गुणवत्तेनुसार प्रवेश द्यावेत, क्षमतेपेक्षा जादा प्रवेश देऊ नये, कोरोना परिस्थितीमुळे सोशल डिस्टन्स, सॅनिटायजेशनचे नियम पाळावेत अशा सूचना जिल्ह्याच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर यांनी दिल्या.
जिल्ह्यातील मुख्याध्यापक, प्राचार्यांच्या आॅनलाइन झूम बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच जात प्रमाणपत्रासाठी अर्ज नाकारूनये, शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील जात ग्राह्य धरावी, ज्या कनिष्ठ महाविद्यालयांना शक्य आहे त्यांनी विद्यार्थ्यांकडून आॅनलाइन अर्ज स्वीकारावेत, अशीही माहिती दिली. यावेळी नोडल अधिकारी फ्रान्सिस चव्हाण, प्रा. वैभव सरोदे यांनी सहाय्य केले. मालेगाव तालुक्यातून
दहावीला एकूण १३,०४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, अकरावीसाठी मालेगाव शहर व ग्रामीण प्रवेशाची माहिती कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेचे जिल्हा सचिव प्रा. अनिल महाजन यांनी दिली.