१०० मेट्रिक टन कोकणचा हापुस आंबा अमेरिकेत रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 08:44 PM2019-05-05T20:44:47+5:302019-05-05T20:45:25+5:30

लासलगाव : येथील डॉ. भाभा अणू संशोधन केंद्राच्या ‘कृषक’मधून यंदाच्या हंगामात आतापर्यंत १०० मेट्रीक टन आंब्यावर विकिरण प्रक्रि या करून तो अमेरिकेला रवाना झाला येथील कृषक मधून हापूस, केशर, पायरी असा १०० मेट्रिक टन आंबा हा २७ हजार बॉक्स मधून अमेरिकेतील खवय्यांसाठी पाठविण्यात आला आहे.

 100 mt of hawthorna mango in the US | १०० मेट्रिक टन कोकणचा हापुस आंबा अमेरिकेत रवाना

१०० मेट्रिक टन कोकणचा हापुस आंबा अमेरिकेत रवाना

Next
ठळक मुद्देकृषक मधुन आंब्यावर विकिरण प्रक्रि या

लासलगाव : येथील डॉ. भाभा अणू संशोधन केंद्राच्या ‘कृषक’मधून यंदाच्या हंगामात आतापर्यंत १०० मेट्रीक टन आंब्यावर विकिरण प्रक्रि या करून तो अमेरिकेला रवाना झाला येथील कृषक मधून हापूस, केशर, पायरी असा १०० मेट्रिक टन आंबा हा २७ हजार बॉक्स मधून अमेरिकेतील खवय्यांसाठी पाठविण्यात आला आहे.
१० एप्रिल २०१९ पासून लासलगाव येथील कृषक मधुन आंब्यावर विकिरण प्रक्रि या केली जात असून त्यानंतर या आंब्याची निर्यात केली जात आहे. अशी माहिती प्रणव पारेख, महेन्द्र अवधाने, संजय आहेर यांनी दिली. भारतातील नऊ राज्ये यंदा आंबा निर्यातीसाठी सज्ज झाली आहे.
देशातील आंबा उत्पादकांनी निर्यातीसाठी २९ हजार ९९ प्लॉटची नोंदणी केली आहे. यात सर्वाधिक कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र आघाडीवर आहे.
लासलगांव येथील कृषक मधून हापूस, केशर, पायरी असा १०० मेट्रिक टन आंबा हा २७ हजार बॉक्समधुन रवाना झाला.लासलगाव येथील डॉ. भाभा अणू संशोधन केंद्राच्या ‘कृषक’मधून यंदाच्या हंगामात आतापर्यंत १०० मेट्रीक टन आंब्यावर विकिरण प्रक्रि या करून तो अमेरिकेला रवाना झाला आहे.

गेल्या काही वर्षांपासून भारतीय हापूस व इतर आंबे अमेरिकेला निर्यात केले जात आहेत. अमेरिकेच्या बाजारात कोणत्याही कृषी मालास प्रवेश करावयाचा असेल तर त्याला प्रथम २१ विविध निकषांचे अडथळे पार करावे लागतात. त्यात तो माल किटाणूविरहित असणे सर्वात महत्वाचे आहे. याकरिता आंब्यावर विकिरण प्रक्रि या करणे बंधनकारक असल्याने भाभा अणू संशोधन केंद्राने लासलगाव येथे खास केंद्राची उभारणी केली.
आंब्याची जागतिक बाजारपेठ विस्तारण्याच्या उद्देशाने या केंद्राची धुरा काही काळ महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने स्वीकारली. सध्या एग्रो सर्ज इरिडेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी द्वारे खासगी तत्वावर आंबा निर्यातदारांना सेवा पुरवत आहे.
लासलगाव येथे विकिरण प्रक्रि या करून आंबे अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को, लॉस एन्जलिस, शिकागो, न्यू जर्सी, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क या शहरांमध्ये पाठविले जात आहेत.

या राज्यातील आंब्याची निर्यात
महाराष्ट्र : हापूस, केसर, पायरी
आंध्र प्रदेश : बैगनपल्ली, सुवर्णारेखा, नीलम, तोतापुरी,
गुजरात : केसर, हापूस, राजापुरी, जमादार, तोतापुरी, नीलम, दशहरी, लंगडा
मध्य प्रदेश : बॉम्बे ग्रीन, हापूस, दशहरी, फाजील, लंगडा.
 

Web Title:  100 mt of hawthorna mango in the US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mangoआंबा