सिन्नर : मुंबई, पुणे येथून येणाऱ्यांचे १०० टक्के विलगीकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधींची मदत घेतली जाणार आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राखला जावा यासाठी उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय साधण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.विलगीकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधींची मदत घेतली जाणार असून, गर्दीवर आळा घालण्यासाठी भरारी पथकांची निर्मिती आणि गोपनीय माहिती देण्याकरिता हेल्पलाइन सुरू करण्याचा निर्णय लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाºयांच्या बैठकीत घेण्यात आला. उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीस तहसीलदार राहुल कोताडे, नायब तहसीलदार दत्ता जाधव, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, नगराध्यक्ष किरण डगळे, सभापती शोभा बर्के, उपसभापती संग्राम कातकडे, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, पंचायत समिती सदस्य जगन्नाथ भाबड, सुमन बर्डे, संगीता पावसे, संजय सानप, दीपक खुळे, नामदेव शिंदे आदी उपस्थित होते.मुंबईसह अन्य हॉटस्पॉट असलेल्या शहरातून नागरिक गावी परतत आहेत. परतणाºया नागरिकांपासून स्थानिकांना कोरोनाची बाधा होऊ लागल्याने प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे. बाहेरून येणाºया नागरिकांचे १०० टक्के विलगीकरण करणे गरजेचे असल्याचा मुद्दा लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. त्यावर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. ग्रामपंचायत स्तरावर बाहेरून येणाºया नागरिकांचे विलगीकरण नियोजन अगोदर होणे गरजेचे होते. अन्य जिल्ह्यात यापूर्वीच झाले आहे. गावनिहाय पालक अधिकाºयांची नेमणूक बाहेरून येणाºया नागरिकांना स्थानिक शाळा अथवा वेगळी राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे. ग्रामपंचायत पातळीवर नियोजन होण्यासाठी ग्रामसेवक अथवा तलाठी यास पालक अधिकारी म्हणून नेमण्यात येणार आहे. सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांच्या मदतीतून ही सुविधा स्थानिक ठिकाणी उपलब्ध करण्यात येणार आहे.
गोपनीय माहितीसाठी हेल्पलाइन नंबरबाहेरून येणारे नागरिक, नियमांची होणारी पायमल्ली याबाबत स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थांच्या अडचणी विचारात घेता हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी त्यांच्याजवळील गोपनीय माहिती देऊन त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
गर्दी नियंत्रणासाठी फिरते पथकलॉकडाउन काळात दुकाने सुरू करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना आढळून आले आहे. नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यास आळा घालण्यासाठी भरारी पथक नेमण्यात येणार आहे. गर्दी, नियमाव्यतिरिक्त सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत या वेळेव्यतिरिक्त दुकाने सुरू असल्यास दुकाने यांची छायाचित्रे काढून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.