१२८७ धाेकादायक मिळकती, पाच हजार रहिवासी : मरण्याची हौस नाही; पण...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:11 AM2021-06-06T04:11:32+5:302021-06-06T04:11:32+5:30
शहरातील नदीकाठची घरे आणि काझीची गढी हा सर्वाधिक धोकादायक भाग असला तरी हातावरचे पोट असलेल्यांना घराचे छप्पर जेमतेम ...
शहरातील नदीकाठची घरे आणि काझीची गढी हा सर्वाधिक धोकादायक भाग असला तरी हातावरचे पोट असलेल्यांना घराचे छप्पर जेमतेम आहे, तेच हिरावले तर जायचे कुठे, असा त्यांचा प्रश्न आहे.
नाशिक शहरात नदीकाठची घरे, ढासळणारी गढी तसेच गावठाणातील पडके वाडे आणि अन्य धोकादायक मिळकती असे चार प्रकारे वर्गीकरण होऊ शकते. अनेक वर्षांपासूनचे हे प्रश्न आहेत; परंतु त्यावर तोडगा निघत नाही. कधी गढी ढासळून झोपडपट्टीत राहणाऱ्याचा मृत्यू होता तर कधी वाडे पडल्याने तांबट लेनसारख्या भागात दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाले आहेत. सातपूर येथे नासर्डी नदीलगत कांबळेवाडी असून तेथे एका कारखान्याची भिंत पावसाळामुळे पडून चार जणांचा मृत्यू देखील झाला होता. अशा स्थितीत देखील दरवर्षी नोटीस बजावल्यानंतर नदीकाठचे नागरिक जेमतेम स्थलांतरित होतात. बाकी नागरिक वाडे किंवा गढी देखील खाली करीत नाहीत. महापालिकेकडून गावठाण विकासाचे ठोस धाेरण आखले जात नसल्याने समस्या कायम आहे.
इन्फो...
वारंवार नोटीस; पण रहिवासी ऐकेनात
महापालिकेकडून दर पावसाळ्यात नेाटीस दिली जाते. मात्र, वाडे मालक आणि नागरिक वाद आहेत, वाडा सोडला तर नंतर विकासात जागा मिळणार नाही, म्हणून वाडे चालक जात नाही तर दुसरीकडे गढीवरील नागरिक देखील तेथून हटण्यास तयार नाहीत.
इन्फो..
वाडे इमारती कोसळल्या तर जबाबदार कोण?
गावठाणातील क्लस्टर विकास योजना शासन दरबारी पडून आहे. त्यातच घरमालक आणि भाडेकरू वादामुळे नागरिक पडके धोकादायक वाडे सोडण्यास तयार नाहीत. महापालिकेकडून तात्पुरत्या स्थलांतरासाठी शाळा, धर्मशाळा सज्ज ठेवल्या जातात. मात्र, त्याचा उपयोग होत नाही.
इन्फो..
सारे काही कळते; पण कुठे जाणार?
कोट
माझा वाड्यालगतच्या अन्य पडक्या वाड्यांमुळे महापालिका दरवर्षी मलाही नेाटीस पाठवते; परंतु वाड्यांच्या पुनर्बांधकामाला परवानगी दिली जात नाही. तसेच क्लस्टर प्रकरण देखील २०१७ पासून रखडले आहे. ते मंजूर झाले तर पुनर्विकास तरी होईल.
- मुळचंद भटीजा, तांबट लेन, जुने नाशिक