१३ हजार शेतकऱ्यांना मिळाले पीकविम्याचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 11:22 PM2020-08-01T23:22:37+5:302020-08-02T01:27:40+5:30

पेठ : यावर्षी खरीप हंगाम धोक्यात येण्याची चिन्हे दिसत असल्याने दुष्काळाची चाहूल लागलेल्या पेठ तालुक्यातील तब्बल १३ हजार ५०७ शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेचा आधार घेतला आहे.

13,000 farmers get crop insurance cover | १३ हजार शेतकऱ्यांना मिळाले पीकविम्याचे कवच

१३ हजार शेतकऱ्यांना मिळाले पीकविम्याचे कवच

Next
ठळक मुद्देपेठ तालुक्यात विक्र मी नोंदणी : वनपट्टेधारकांनाही मिळणार लाभ; खरीप हंगाम धोक्यात येण्याची चिन्हे

लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : यावर्षी खरीप हंगाम धोक्यात येण्याची चिन्हे दिसत असल्याने दुष्काळाची चाहूल लागलेल्या पेठ तालुक्यातील तब्बल १३ हजार ५०७ शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेचा आधार घेतला आहे.
पेठ तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा केवळ २५ टक्के पाऊस झाला असून, लावणी केलेल्या भात व नागली पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना भरपाईचा आधार म्हणून प्रधानमंत्री पीकविमा योजनेत दि. ३१ जुलै या अखेरच्या मुदतीत दहा हजार ५६२ शेतकºयांनी आॅनलाइन तर दोन हजार ९४५ शेतकºयांनी आॅफलाइन विमा घेतला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल तीन पटीने विमाधारकांची वाढ झाली असून, कृषी विभागाच्या वतीने शेतकरीवर्गात केलेल्या जनजागृती व आॅनलाइन विमा भरण्यासाठी देण्यात येणाºया सुविधांमुळे शेतकºयांना विमा घेणे सोपे झाले.१०० टक्के भरपाई देण्याची मागणी
पेठ तालुक्यातील भात, नागली, वरई या पिकांचे पूर्ण नुकसान झाले असून, यानंतरच्या पावसाचा शेतकºयांना काहीही फायदा होणार नसल्याने विमा कंपनीने सरसकट विम्याचा लाभ द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मागील वर्षी विमा कंपन्यांकडून ग्रामीण भागातील बहुतांश शेतकºयांना भरलेल्या हप्त्यापेक्षाही कमी रक्कम प्राप्त झाल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली होती.वनपट्टेधारकांना आॅफलाइन सुविधा
आदिवासी भागात बहुतांश शेतकरी वनपट्टेधारक असून, सातबारा नसल्याने अशा शेतकºयांना आॅनलाइन विमा घेणे शक्य नसून कृषी विभागामार्फत अशा वनपट्टे (फॉरेस्ट प्लॉट) धारकांसाठी आॅफलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे विमाधारकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.दरवर्षी बदलणारे हवामान आणि पावसाचा लहरीपणा यामुळे शेतकºयांना पिकांची हमी नसल्याने प्रधानमंत्री राष्ट्रीय पीकविमा योजनेत या वर्षी विक्र मी नोंदणी झाली असून, ज्या शेतकºयांकडे सातबारा नाही मात्र वनपट्टे जमीन आहे अशा शेतकºयांनाही या योजनेत सामावून घेतले आहे. नुकसानभरपाई बाबत कृषी विभाग शेतकºयांच्या सदैव सोबत आहे.
- अरविंद पगारे,
तालुका कृषी अधिकारी, पेठ

Web Title: 13,000 farmers get crop insurance cover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.