१३५ रुग्णांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 01:07 AM2021-02-22T01:07:04+5:302021-02-22T01:07:57+5:30
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आठवडाभरापासून वाढ होत असून, रविवारी बाधित संख्या ३५२वर पोहोचली आहे. मनपा क्षेत्रात एक आणि ग्रामीणला झालेल्या दोन मृत्युमुळे मृतांची संख्या २०८८ झाली आहे. दरम्यान, १३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आठवडाभरापासून वाढ होत असून, रविवारी बाधित संख्या ३५२वर पोहोचली आहे. मनपा क्षेत्रात एक आणि ग्रामीणला झालेल्या दोन मृत्युमुळे मृतांची संख्या २०८८ झाली आहे. दरम्यान, १३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या एक लाख १९ हजार ९५८वर पोहोचली असून, त्यातील एक लाख १५ हजार ९२५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर २०८८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९६.६४ आहे. त्यात नाशिक शहरात ९७.१९, ग्रामीण ९६.१४, मालेगाव शहरात ९२.०४, तर जिल्हाबाह्य ९३.५१ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे.