पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील चार द्राक्ष उत्पादक शेतकर्यांना १६ लाखांना गंडा घालणाºया पाच व्यापाऱ्यांविरूद्ध पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरवाडे वणी येथील शेतकरी लक्ष्मण पंढरीनाथ निफाडे यांची ७ लाख ४१ हजार रूपयांची फसवणूक व्यापाºयाने केली आहे. याप्रकरणी निफाडे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी नाईम राहेणी (रा. अमरोहा, उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसर्या घटनेत पालखेड मिरची येथील शेतकरी सुरेश घेवरचंद लोढा यांची २ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक व्यापार्याने केली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी संतोष भाऊसाहेब सांगळे (रा. उगाव, ता. निफाड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कोकणगाव (ता. निफाड) येथील शेतकरी चेतन साहेबराव मोरे यांची ३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी भोलानाथ सोनी, मोहम्मद फारूख (दोन्ही रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, चौथ्या घटनेत साकोरे (मिग) येथील शेतकरी प्रभात तुकाराम जाधव यांची 3 लाखांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी राहुल सुभाष गुंजाळ (रा. निफाड रोड, पिंपळगाव बसवंत) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदशर्नाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे, सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश चौधरी, युवराज सैंदाणे आदी तपास करीत आहे.-----------------पोटाच्या पोराप्रमाणे शेतीमाल पिकवला जातो बाजारात नेले जाते आणि तेथे व्यापारी हमी भाव तर नाही देत उलट शेतक?्यांची लूट करतात त्यामुळे शेतक?्यांची फसवणूक करणा?्या व्यापा?्यांना कडक शासन झाले पाहिजे जेणेकरून भविष्यात शेतकºयांची फसवणूक कोणीही करणार नाही.-केशव बनकर,प्रगतशील शेतकरी