१६ पाणी योजनेची जलवाहिनी जीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 08:53 PM2020-10-12T20:53:59+5:302020-10-13T01:43:17+5:30

लासलगाव : विंचूर सह १६ गाव पाणीपुरवठा योजना पाईपलाईन जीर्ण झाल्याने त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व ग्रामीण पाणीपुरवठ्याचे वरिष्ठ अधिका?्यांनी सोमवारी नांदूर मधमेश्वर बंधारा जवळ जॅकवेल येथे जाऊन पाहणी केली

16 Waterworks of water scheme dilapidated | १६ पाणी योजनेची जलवाहिनी जीर्ण

१६ पाणी योजनेची जलवाहिनी जीर्ण

Next
ठळक मुद्देलासलगाव : पाणीपुरवठा योजनेची अधिकाऱ्यांकडून पाहणी

लासलगाव : विंचूर सह १६ गाव पाणीपुरवठा योजना पाईपलाईन जीर्ण झाल्याने त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होत असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व ग्रामीण पाणीपुरवठ्याचे वरिष्ठ अधिका?्यांनी सोमवारी नांदूर मधमेश्वर बंधारा जवळ जॅकवेल येथे जाऊन पाहणी केली दरम्यान या १६ गाव पाणी योजना पाईपलाईन संदर्भात मंगळवार ( दि.१३) मंत्रालय मुंबई येथे हे अन्न नागरी व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या दालनात तातडीची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती १६ गाव पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर यांनी दिली. लासलगाव विंचूर सह १६ गाव पाणीपुरवठा योजना नांदूर मधमेश्वर बंधारा येथून कार्यान्वित आहे. सध्या नांदूर मधमेश्वर बंधा?्यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग देखील सुरू आहे या बंधा?्यात मुबलक पाणी असतानाही केवळ पाईपलाईन जीर्ण झालेली असल्याकारणाने या योजनेतील समाविष्ट गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यास अनेकदा विलंब होत आहे तर पाईपलाईन जीर्ण झालेली असल्याने या फुटलेल्या पाईपलाईन मधून पाण्याचा विसर्ग होत असल्याने शेतक?्यांचे नुकसान होत आहे.
सोमवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे मुख्य अभियंता देवेंद्र लांडगे, कायर्कारी अभियंता सुबोध मोरे, उपअभियंता पी एस पाटील,शाखा अभियंता अशोक बिन्नर ,ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे उपअभियंता संजय मिस्त्री, शाखा अभियंता अमोल घुगे, रमेश काळुंखे यांनी या योजनेच्या नांदूर मधमेश्वर परिसरात पाईप लाईनची पाहणी केली. यावेळी सोळा गाव पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर व सचिव शरद पाटील यांनी या योजनेच्या त्रुटी निदशर्नास आणून दिल्या. पाणी असतानाही पाईपलाईन जीर्ण झालेली असल्याने ही पाईपलाईन बदलणे गरजेचे असल्याचे यावेळी जयदत्त होळकर यांनी अधिका?्यांच्या निदशर्नास आणून दिले. परिसरात पाईपलाईन लिकेज मुळे त्रस्त शेतक?्यांची भेट यावेळी अधिका?्यांनी घेतली. (१२ लासलगाव २)

 

Web Title: 16 Waterworks of water scheme dilapidated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.