जिल्ह्यात ५८९५ जागांसाठी  १६,६०२ उमेदवार पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 01:03 AM2021-01-02T01:03:47+5:302021-01-02T01:05:34+5:30

जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींमधील ५८९५ जागांसाठी १६,६०२ उमेदवार निवडणूक   रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी दाखल झालेल्या १७ हजार अर्जांची छाननी होऊन अवघे ४०४ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.  मालेगावमधील सर्वधिक १११ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. दरम्यान, येत्या ४ जानेवारी रोजी अर्ज माघारीचा दिवस असल्याने निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. 

16,602 candidates are eligible for 5895 seats in the district | जिल्ह्यात ५८९५ जागांसाठी  १६,६०२ उमेदवार पात्र

जिल्ह्यात ५८९५ जागांसाठी  १६,६०२ उमेदवार पात्र

Next
ठळक मुद्देग्रामपंचायत : छाननीत ४०४ अर्ज झाले बाद

नाशिक : जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींमधील ५८९५ जागांसाठी १६,६०२ उमेदवार निवडणूक   रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी दाखल झालेल्या १७ हजार अर्जांची छाननी होऊन अवघे ४०४ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.  मालेगावमधील सर्वधिक १११ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. दरम्यान, येत्या ४ जानेवारी रोजी अर्ज माघारीचा दिवस असल्याने निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. 
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याच्या राजकीय हालचाली एकीकडे सुरू असताना उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. जिल्ह्यात १३ तालुक्यातील  तब्बल १७ हजार सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.   गुरुवारी (दि.३१) अर्ज छाननी प्रक्रियेत  ४०४ उमेदवारांचे अर्ज कागदपत्रांची अपूर्तता व तांत्रिक अडचणीमुळे बाद ठरले. उमेदवारांची संख्या मोठी असल्याने गुरुवारी छाननी प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. शुक्रवारी याबाबतची अंतिम माहिती समोर आली. त्यानुसार १६ हजार ६०२ इतके उमेदवार रिंगणात राहिले आहेत. 
 जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींच्या २१३२ प्रभागांमधील एकूण ५८९५ जागांसाठी निवडणूक होत आहे. कमीत कमी सात आणि जास्तीत जास्त १७ इतकी सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. 
सिन्नर तालुक्यातील १०० तर मालेगावातील ९९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा फड रंगणार आहे. मालेगाव तालुक्यात सर्वाधिक ९६९ सदस्य संख्या आहे.
तालुकानिहाय उमेदवार
तालुका             उमेदवार
कळवण               ६०१ 
येवला              १७७१ 
इगतपुरी            १४७ 
दिंडोरी              १३०१ 
त्र्यंबकेश्वर            ५० 
सिन्नर               २६३९ 
निफाड              २४०७ 
बागलाण            ११०५ 
चांदवड             १११५ 
देवळा                ३३८ 
नांदगाव             १६८५ 
मालेगाव            २७०० 
नाशिक              ७४३

Web Title: 16,602 candidates are eligible for 5895 seats in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.