नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी दि. १७ मार्चला सकाळी ११ वाजता निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यानुसार, विभागीय आयुक्तांनी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. दरम्यान, सभापतिपदासाठी सत्ताधारी भाजपात सभागृहनेता दिनकर पाटील, उद्धव निमसे आणि हिमगौरी अहेर-आडके यांच्यात रस्सीखेच असून, शिवसेनाही उमेदवार देणार आहे.महापालिकेच्या स्थायी समितीतील निवृत्त झालेल्या आठ जागांवर भाजपाकडून दिनकर पाटील, उद्धव निमसे, भाग्यश्री ढोमसे आणि पुष्पा आव्हाड, शिवसेनेकडून संतोष साळवे व संगीता जाधव, कॉँग्रेसकडून समीर कांबळे, तर राष्टÑवादीकडून सुषमा पगारे यांची नियुक्ती झालेली आहे, तर भाजपाच्या उर्वरित पाच सदस्यांनी राजीनामे दिल्याने त्यांच्या जागांवर मीरा हांडगे, कोमल मेहरोलिया, भिकूबाई बागुल, हिमगौरी आडके व शांताबाई हिरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याशिवाय, सेनेचे प्रवीण तिदमे, भागवत आरोटे आणि मनसेच्या कोट्यातून नियुक्त झालेले अपक्ष मुशीर सय्यद हे अद्याप सदस्यपदी कायम आहेत. सत्ताधारी भाजपात सभापतिपदासाठी सभागृहनेता दिनकर पाटील, उद्धव निमसे आणि हिमगौरी अहेर-आडके यांच्यात रस्सीखेच आहे. त्यात हिमगौरी अहेर-आडके यांचे नाव अग्रभागी असल्याचे सांगितले जात असले तरी, दिनकर पाटील यांच्याही नावाची चर्चा आहे. परंतु, यंदा भाजपातील निष्ठावंतांना उमेदवारी देण्याबाबत आग्रह धरला जात असल्याने हिमगौरी अहेर यांचे नाव पुढे केले जात आहे.
सभापतिपदासाठी १७ ला निवडणूक मनपा स्थायी समिती : भाजपात रस्सीखेच, सेनाही लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 1:18 AM
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी दि. १७ मार्चला सकाळी ११ वाजता निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे.
ठळक मुद्देशिवसेनाही उमेदवार देणार आहेभाजपातील निष्ठावंतांना उमेदवारी देण्याबाबत आग्रह