१७ बळी : बुधवारी जिल्ह्यात ९७२ नवे रुग्ण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 08:02 PM2020-09-02T20:02:55+5:302020-09-02T20:06:02+5:30
दिवसभरात जिल्हयात १ हजार २८२ संशियत रु ग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यापैकी १ हजार ६४ रुग्ण शहरातील आहे. एकुणच शहरात संशयित रु ग्णांसह कोरोना रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे.
नाशिक : जिल्ह्याची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढू लागली आहे. बुधवारी (दि.२) नव्याने ९७२ रु ग्ण जिल्ह्यात आढळून आले. यामुळे एकूण रु ग्णसंख्या ३९ हजार १४६ इतकी झाली आहे. दिवसभरात १७ रु ग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. सर्वाधिक ५९४ रुग्ण केवळ नाशिक शहरात मिळून आले. जिल्ह्यात दिवसभरात ९७२ रु ग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली.
मागील आठवड्यात कोरोनाबधित रु ग्णांचा आकडा घसरला होता; मात्र अचानकपणे कोरोना रु ग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागल्याचे आकडेवारीवरु न दिसते दिवसभरात जिल्हयात १ हजार २८२ संशियत रु ग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यापैकी १ हजार ६४ रु ग्ण शहरातील आहे. एकुणच शहरात संशयित रु ग्णांसह कोरोना रु ग्णांची संख्याही वाढू लागली आहे. यामुळे नागरिकांनी शहरात वावरताना अधिकाधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. एकूणच शहरवासीयांकरिता कोरोना संक्र मणाचा धोका अधिकच वाढला आहे.. नाशिक ग्रामीणच्या तुलनेत शहरात स्थिती अधिक भयावह होत चालली आहे. जिल्ह्यातील वाढत्या रु ग्णसंख्या नियंत्रणात आणताना प्रशासनाची दमछाक होत आहे. बुधवारी जिल्ह्यात १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ८९४ इतका झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९३ हजार ३९२ रु ग्ण निगेटिव्ह आढळून आले आहेत.
सध्या जिल्हयात आतापर्यंत ३१ हजार १४१ रु ग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तसेच ७ हजार १११ रु ग्ण उपचार घेत आहेत. १ हजार ३८७ नमुना चाचणी अहवाल आतापर्यंत प्रलंबित आहेत. नाशिककरांना अधिकाधिक खबरदारी घेत शासनाने सांगितलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. सध्याचा काळ सण-उत्सवांचा असल्याने संक्र मणाचा धोका अधिक वाढला आहे.