नाशिक : जिल्ह्यात बुधवारी (दि. २५) नवीन २९५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, १८९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, तर जिल्ह्यात एकूण चार रुग्ण दगावल्याने कोरोनाबळींची संख्या १७७३ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या ९९ हजार ३८१ वर पोहोचली असून, त्यातील ९४ हजार ८४६ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. २७६२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९५.४४ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९६.१९, नाशिक ग्रामीण ९४.०६, मालेगाव शहरात ९३.७४, तर जिल्हाबाह्य ९१.८४ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २७६२ बाधित रुग्णांमध्ये १६०१ रुग्ण नाशिक शहरात, १०४० रुग्ण नाशिक ग्रामीणला, ९७ रुग्ण मालेगावमध्ये, तर २४ रुग्ण जिल्हाबाह्य क्षेत्रामधील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या तीन लाख ७२ हजार ९९४ असून, त्यातील दोन लाख ७१ हजार ५६० रुग्ण निगेटिव्ह, तर ९९ हजार ३८१ रुग्ण बाधित आढळून आले असून, २०५३ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.