पाणी योजनांसाठी २ कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:11 AM2021-05-31T04:11:10+5:302021-05-31T04:11:10+5:30

तालुक्यात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची धग जाणवत असते. यंदा तालुक्यातील वेळुंजे, हेदपाडा, सोमनाथनगर, वेळे, मुरंबी, नांदगाव, कोहळी, तोरंगण, ...

2 crore fund sanctioned for water schemes | पाणी योजनांसाठी २ कोटींचा निधी मंजूर

पाणी योजनांसाठी २ कोटींचा निधी मंजूर

Next

तालुक्यात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची धग जाणवत असते. यंदा तालुक्यातील वेळुंजे, हेदपाडा, सोमनाथनगर, वेळे, मुरंबी, नांदगाव, कोहळी, तोरंगण, खैरायपाली या गावांचे टंचाई प्रस्ताव पाठवण्यात आले होते. सध्या तीन खासगी टँकरने तीन गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या काही दिवसात कोणत्याही नवीन गावाचा टंचाईचा प्रस्ताव आलेला नाही. मात्र, तालुक्यातील हरसूल परिसरातील मुरंबी, शिरसगाव, मुरंबी, कोटंबी या गावांसह हरसूलच्या पश्चिम पट्ट्यातील खरशेत, सावरपाडा, खैरायपाली, कास देवडोंगरा, काथवटपाडा आदी गावांमध्ये पाणीटंचाईची धग जाणवत असते. गेल्या ५-६ दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण असले तरी उष्मा मोठ्या प्रमाणात जाणवतो आहे. तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आमदार हिरामण खोसकर यांनी शासनदरबारी पाठपुरावा करत सुमारे १ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. त्यामुळे जलजीवन मिशन अंतर्गत ही कामे लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इन्फो

प्रस्तावित कामे व निधी

१) गणेशगाव येथे नळपाणी पुरवठा योजना - १५.८९ लक्ष रुपये

२) ब्राह्मणवाडे पाणी योजना - १५.९० लक्ष रुपये

३) नांदगाव कोहळी पाणी योजना - १५.५८ लक्ष रुपये

४) गणेशगाव ( वा) गोरठाण - १६ लक्ष रुपये

५) पेगलवाडी पाणी योजना - १६.६१ लक्ष रुपये

६) गंगाम्हळुंगी (शास्त्रीनगर) - १५.४८ लक्ष रुपये

७) वेळे (होलदार नगर) पाणी योजना - १७.५०लक्ष रुपये

कोट....

पाणी योजनेची ही सर्व कामे नवीन असून निधीदेखील मंजूर झाला आहे. लवकरच या कामांना सुरुवात होईल. पाणी योजनांबरोबरच रस्ते, घरकुले, शाळा व अंगणवाड्यांच्या इमारती आदी कामांसाठीही निधी आणला जात आहे. इगतपुरी त्र्यंबकचा समतोल सर्वांगीण विकास केला जाईल.

- हिरामण खोसकर, आमदार

फोटो- ३० त्र्यंबक वॉटर-१

===Photopath===

300521\30nsk_12_30052021_13.jpg

===Caption===

फोटो- ३० त्र्यंबक वॉटर-१

Web Title: 2 crore fund sanctioned for water schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.