---/
नाशिक : म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट विभागाकडून पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील काट्या मारुती चौक (जुना आडगाव नाका) ते निमाणी बस स्थानकपर्यंतचा रस्ता तसेच मखमालाबादनाका ते रामवाडीपर्यंतचा रस्ता दोन्ही बाजूंनी ''नो-पार्किंग झोन'' म्हणून पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी घोषित केला आहे.
स्मार्टसिटी अंतर्गत भूमिगत मलवाहिका, पावसाळी गटार टाकण्याचे काम वरील रस्त्यावरील ५१५ मीटर रोडचे ५०-५० मीटर टप्प्याने काम होणार असल्याचे संबंधित विभागाने कळविले आहे. यामुळे वाहतूक सुरळीत राहण्यासाठी रस्त्यावर दुभाजकाव्या दोन्ही बाजूने कुठल्याही प्रकारची वाहने उभी करण्यास मज्जाव करण्यात आल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. या रस्त्यावरील वाहतूक त्याच मार्गाने सुरु राहील. परंतु आता रस्त्याचे काम सुरू होणार असल्याने रोड दुभाजकाच्या कडेला दोन्ही बाजूस नमूद मार्गावर २०० दिवसांकरिता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी कामाच्या ठिकाणी नो पार्किंग झोन करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे मखमलाबादनाका ते रामवाडी प्रवेशद्वार पावेतो अंतर्गत भूमिगत विद्युत वाहिका, मला पाईपलाईन वे नमूद रस्त्यावरील ३९५ मीटर रोडचे ५०-५० मीटर टप्प्याने काम होणार असल्याने नमूद रस्त्यावर रोडदुभाजकाच्या दोन्ही बाजूस वाहनांना जाणे-येण्यासाठी वाहतूक सुरू ठेवून रस्त्याच्या कडेला कामाच्या ठिकाणी नो पार्किंग झोन जाहीर करण्यात आला आहे.
सर्व प्रकारव्या वाहनांसाठी वाहतूक जाण्या व येण्यासाठी दुहेरी वाहतूक याच रस्त्याने सुरु होती. सदरची वाहतूक त्याच मागनि सुरू राहील. परंतु आता रस्त्याचे कडेला काम सुरु होणार असल्याने रोड दुभाजकाच्या कडेला दोन्ही बाजूस मार्गावर २०० दिवसांकरीता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नो पार्किंग झोन जाहीर करण्यात आला आहे.
ही अधिसूचना १ नोव्हेंबर पर्यंत अमलात राहणार आहे. वरील सर्व प्रकारचे निर्बंध हे पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमनदलाची व अत्यावश्यक व आपत्कालीन सेवेतील वाहने यांनादेखील लागू राहणार आहे.
-----इन्फो-----
पोलिसांकडून ''स्मार्ट सिटी''ला निर्देश
काटया मारुती चौक ते निमाणी बस स्थानकपर्यंत तसेच रामवाडी रस्त्यावर योग्यरीत्या सुरक्षित बॅरिकेड लावणे. रात्रीच्यावेळी वाहनचालकांना दिसेल असे रेडियम सूचना फलक बसविणे तसेच वाहतूक पोलिसांच्या मदतीकरीता ५० मीटर दोन्ही बाजूने ४ ट्रॅफिक वार्डन यांची नियुक्ती नमूद कालावधी करीता करण्यात यावी. रामवाडी प्रवेशद्वार ते रामवाडीपर्यंत कामाच्याठिकाणी योग्यरीत्या बॅरिकेड करणे. सहा ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त करणे.
कामाच्या ठिकाणी अपघात झाल्यास त्यास संबंधित कंपनी जबाबदार राहणार असल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.