नाशकात अकरावीच्या प्रवेशासाठी २४ हजार जागा ; कनिष्ठ महाविद्यालयांना १५ जुलैपर्यंत नोंदणीची मूदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 06:06 PM2020-07-06T18:06:48+5:302020-07-06T18:16:02+5:30
अकरावीची प्रवेशप्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. शहरातील ५९ उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुमारे २३ हजार ९६० जागा उपलब्ध आहे. या प्रवेश क्षमतेत झालेला बदल नोंदविण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया पूर्ण होताच विद्यार्थ्यांना १५ जुलैपासून आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरण्याची संधी मिळणार आहे.
नाशिक : कोरोनामुळे दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल लांबले असून, त्यामुळे पुढील प्रभावीत झालेली अकरावीची प्रवेशप्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. शहरातील ५९ उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुमारे २३ हजार ९६० जागा उपलब्ध आहे. या प्रवेश क्षमतेत झालेला बदल नोंदविण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया पूर्ण होताच विद्यार्थ्यांना १५ जुलैपासून आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, गतवर्षी नाशिकमध्ये २३ हजार ९६ जागांपैकी केवळ १९ हजार २३८ जागांवरच प्रवेश होऊ शकले होते. तर जवळपास ४ हजार ७२२ जागां रिक्त राहिल्या होत्या.
शिक्षण विभागाने टप्प्याटप्याने शैक्षणिक कामकाज रुळावर आणण्यासाठी अकरावी प्रवेशप्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. दहावीचा निकाल जुलैअखेरपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना १५ जुलैपासून आॅनलाइन अर्जाचा पहिला भाग भरता येणार आहे. त्यापूर्वी १५ जुलैपर्यंत उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करण्यात येणार आहे. संबंधित मुख्याध्यापक तथा प्राचार्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली असून, १६ जुलैपर्यंत नोंदणीकृत उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती तपासून अंतिम करण्यात येणार आहे, तर विद्यार्थ्यांना पालकांच्या मदतीने १५ जुलैपासून दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत प्रवेश अर्जाचा भाग एक भरणे व माहिती मान्यतेसाठी शाळा अथवा मार्गदर्शन केंद्राची निवड करणे, अर्जाला मान्यता मिळल्याची खात्री करणे आदी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोन भरता येणार असून, त्यात महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदवून संकेतस्थळावर अंतिम अर्ज सादर करता येणार आहे. दरम्यान, यावर्षी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही फेर होणार नसल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, गतवर्षी एकीककडे शहरातील विविध शाळां-महाविद्यालयांमध्ये ४ हजार ७२२ जागा रिक्त राहिल्या होत्या. तर दुसरीकडे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी वारंवार फेºयांमध्ये सहभाग घ्यावाला लागला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालये निवडताना संभ्रमित न राहाता प्रवेश कोणत्या महाविद्यालयात घ्यायचा याचा निर्णय घेऊनच पर्याय निवडण्याची गरज आहे.