पंचवटी : संपूर्ण नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम व गरु ड रथयात्रेला सुमारे २४७ वर्षांची परंपरा असून यंदाही मंगळवारी (दि.१६) कामदा एकादशीला श्रीराम व गरुड रथोत्सव यात्रा सोहळा रंगणार आहे. राम व गरु ड रथयात्रेची तयारी पूर्ण झाली असून, रथांना रंगरंगोटी, सजावट तसेच विद्युत रोषणाईचे काम पूर्ण करण्यात आले आहे.सवाई माधवराव पेशवे एकदा आजारी पडल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्यांना चांगल्या प्रकारे उत्तम आरोग्य लाभावे यासाठी श्रीमंत गोपिकाबाई पेशवे यांनी प्रभू रामराया चरणी लीन होऊन श्रीरामाला नवस केला होता. त्यानंतर सवाई माधवराव पेशवे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पेशवे यांनी श्रीरामाला रामरथ अर्पण करत भारताच्या देखभालीची जबाबदारी त्यांचे मामा सरदार रास्ते यांच्याकडे सोपविण्यात आली होती. सरदार रास्ते यांनी त्यावेळी तरु ण मंडळींना एकत्र आणण्यासाठी सरदार रास्ते आखाडा पाटील संघाची स्थापना केली व त्यातून पैलवान तसेच व्यायामप्रेमी घडविले. पुढे हेच पहिलवान रामरथ ओढण्याचे काम करू लागले. हीच रथ ओढण्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिल्याने आजतागायत रामरथ ओढण्याचे काम सरदार रास्ते आखाडा तालीम संघाकडे आहे.पूर्वीच्या काळी पक्के रस्ते नव्हते, त्यातच रामरथ खडतर दगड धोंडे असलेल्या मार्गाने ओढत न्यावा लागायचा एकदा रथोत्सवाच्या दिवशी रथ ओढताना वाघाडी नाल्यात चिखलात फसला. रथ बाहेर काढण्यासाठी बरेच प्रयत्न करूनही रथ बाहेर काही निघेना तेव्हा पाथरवट समाजाच्या काही युवा कार्यकर्त्यांनी धाव घेत चिखलात फसलेला रथ सुखरूपपणे बाहेर काढला व रथयात्रा पुढे रवाना झाली तेव्हापासून आजपर्यंत रामाच्या रथाची धुरा वाहण्याचा मान हा समस्त पाथरवट समाजाकडे दिला आहे. आजही पाथरवट समाजाचे शेकडो कार्यकर्ते रथोत्सवाच्या दिवशी रामरथाच्या अग्रभागी थांबत धुरा वाहण्याचे काम करतात.शेलार घराण्याला ध्वज-गंधाचा मानपूर्वाश्रमीचे रास्ते आखाडा तालीम संघाचे सदस्य शेलार घराण्यातील पहिलवान हे रामरथाचे सक्रि य कार्यकर्ते होते. पेशव्यांनी त्यांना रामरथ ध्वजाचा मान दिला. मागील अनेक पिढ्यांपासून रामरथ ध्वजाचा मान शेलार घराणे जबाबदारीने सांभाळत आहे. रथोत्सवात सहभागी होणाºया भाविकांना तसेच पाथरवट समाजातील सदस्यांना गंध लावण्याचे काम रमेश शेलार सांभाळत आहे, तर सद्यस्थितीत शेलार घराण्याचे पाचव्या पिढीचे वारस नितीन शेलार रामरथ ध्वजाचा मानपान सांभाळत आहे.रामरथ पंचवटीतच फिरतो४कामदा एकादशीला श्रीराम व गरुड रथोत्सव यात्रा निघते. यात रामरथात भोगमूर्ती असतात, हा रथ नदी ओलांडत नसल्याने पंचवटीतच फिरतो तर गरुडरथात रामाच्या पादुका असल्याने हा रथ नदी ओलांडून जुने नाशिक भागात दिल्ली दरवाजा, रोकडोबा, मेनरोड येथे जातो.बुवांचे रथाभिमुख दिशेने मार्गक्र मण४ रथोत्सवाच्या दिवशी रामरथात रामाच्या भोग मूर्ती ठेवल्या जातात. रथोत्सवाला उत्सवाचे मानकरी बुवा रथाकडे तोंड करून उलट्या दिशेने मार्गक्र मण करतात. गेल्या अनेक पिढ्यांपासून हा मान पुजारी घराण्यातील कुटुंबीयांकडे आहे. यंदाच्या वर्षी श्रीकांत बुवा पुजारी हे उत्सवाचे मानकरी आहे.
श्रीराम, गरु ड रथोत्सवाची २४७ वर्षांची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:34 AM