2.50 कोटींची उलाढाल होणार ठप्प

By admin | Published: June 1, 2017 01:59 AM2017-06-01T01:59:56+5:302017-06-01T02:00:05+5:30

नाशिक :बाजार समितीमध्ये जिल्ह्यासह अकोला, संगमनेर आदी भागातून रोज फळे, भाजीपाला कांदे बटाटे यांची जवळपास सहा हजार पाचशे टन आवक होते

2.50 crore turnover | 2.50 कोटींची उलाढाल होणार ठप्प

2.50 कोटींची उलाढाल होणार ठप्प

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक :बाजार समितीमध्ये जिल्ह्यासह अकोला, संगमनेर आदी भागातून रोज फळे, भाजीपाला कांदे बटाटे यांची जवळपास सहा हजार पाचशे टन आवक होते. या संपामुळे ही आवक थांबण्याची चिन्हे आहेत. यामध्ये चार हजार पाचशे टन भाजीपाल्याचा समावेश आहे. याशिवाय नाशिकमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागासह कोपरगाव, संगमनेर, चाळीसगाव येथून दूध मोठ्या प्रमाणावर येत असते. नाशिक बाजार समितीमधील भाजीपाला नाशिक शहरासह मुंबई व गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर जात असतो. यामुळे शेतकरी संपाचा परिणाम महाराष्ट्राबाहेरील मोठ्या शहरांनाही जाणवणार आहे. या महिन्यात नाशिक बाजार समितीमध्ये फळभाज्यांची सरासरी आवक ४५ हजार क्विंटल झाली.
पालेभाज्यांची आवक ९०० क्विंटल, फळांची आवक ३४०० क्विंटल व कांद्याची ९५०० क्विंटल आवक होते. या महिन्यात बाजार समितीमध्ये रोजची उलाढाल साधारण अडीच कोटींची आहे. नाशिक शहराला स्थानिक गोठेधारकांशिवाय नाशिक, सिन्नर, निफाड, दिंडोरी, इगतपुरी या तालुक्यांमधूनही दूध पुरवठा होत असतो.

Web Title: 2.50 crore turnover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.