सर्व जागांसाठी २८४ उमेदवार रिंगणात आरोग्य विद्यापीठ : विविध प्राधिकरण मंडळ निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:06 AM2017-12-13T01:06:36+5:302017-12-13T01:07:31+5:30
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध प्राधिकरण मंडळाच्या निवडणुकीसाठी विविध जागांसाठी उमेदवारांच्या अर्जांची विद्यापीठ मुख्यालयात छानणी करण्यात आली असून, यामध्ये सर्व जागांसाठी एकूण २८४ उमेदवार पात्र ठरले आहेत.
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध प्राधिकरण मंडळाच्या निवडणुकीसाठी विविध जागांसाठी उमेदवारांच्या अर्जांची विद्यापीठ मुख्यालयात छानणी करण्यात आली असून, यामध्ये सर्व जागांसाठी एकूण २८४ उमेदवार पात्र ठरले आहेत.
विद्यापीठाच्या अधिसभेसाठी राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती व नाशिक या सहा महसूल विभागांतून एकूण ५५ उमेदवार पात्र आहेत. यात मुंबई विभागासाठी १०, पुणे विभागासाठी १५, औरंगाबाद विभागासाठी १३, नाशिक विभागासाठी ०६, नागपूर विभागासाठी ०७, अमरावती विभागासाठी ०४ उमेदवार निवडणुकीसाठी पात्र ठरले आहेत. वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी व तत्सम विद्याशाखेचे एकूण १३ उमेदवार पात्र आहेत. यात वैद्यकीय विद्याशाखेसाठी एकही उमेदवार पात्र नसून, दंत विद्याशाखेसाठी ०१, आयुर्वेद व युनानी विद्याशाखेसाठी ०८, होमिओपॅथी विद्याशाखेसाठी ०१, तर तत्सम विद्याशाखेसाठी ०३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. अभ्यासमंडळाकरिता वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी व तत्सम विद्याशाखांचे एकूण १८० उमेदवार असून, यामध्ये वैद्यकीय विद्याशाखेसाठी २९, दंत विद्याशाखेसाठी १८, आयुर्वेद विद्याशाखेसाठी ९५, होमिओपॅथी विद्याशाखेसाठी २९, नर्सिंग विद्याशाखेसाठी ०६, आॅक्युपेशनल आणि फिजिओथेरपी विद्याशाखेसाठी ०३ उमेदवार वैध ठरले आहेत. प्राध्यापक वगळता शिक्षक गटात निवडणुकीकरिता वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी व तत्सम विद्याशाखांचे एकूण ३६ उमेदवार पात्र असून, यात वैद्यकीय विद्याशाखेसाठी ०५, दंत विद्याशाखेसाठी ०९ आयुर्वेद व युनानी विद्याशाखेसाठी १२, होमिओपॅथी विद्याशाखेसाठी ०१, तर तत्सम विद्याशाखेसाठी ०९ उमेदवार निवडणुकीसाठी पात्र आहेत. निवडणुकीसाठी वैद्य आणि अवैध नामनिर्देशन अर्जांचे अनुषंगाने संबंधितांना हरकत घ्यावयाची असल्यास दि. १२ ते १४ पर्यंत संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत विद्यापीठ मुख्यालयात लेखी स्वरूपात अर्ज सादर करता येणार आहे. या अनुषंगाने प्राप्त हरकतीवर दि. १५ रोजी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर सुनावणी करतील. या निवडणुक प्रक्रियेत उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी मुदत २० डिसेंबर सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असणार आहे.