मातृवंदन योजनेसाठी ३८३ लाभार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 12:45 AM2020-02-12T00:45:18+5:302020-02-12T00:46:49+5:30
केंद्र सरकारच्या मातृवंदन योजनेंतर्गत येथील आरोग्य उपकेंद्रांमध्ये तीन वर्षांमध्ये ३८३ लाभार्थींची नोंदणी केली गेली आहे. गर्भवती महिलांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना सकस आहार घेता यावा, या उद्देशाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत गर्भवती महिलांना तीन टप्प्यांत आर्थिक लाभ दिला जातो.
खामखेडा : केंद्र सरकारच्या मातृवंदन योजनेंतर्गत येथील आरोग्य उपकेंद्रांमध्ये तीन वर्षांमध्ये ३८३ लाभार्थींची नोंदणी केली गेली आहे.
गर्भवती महिलांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना सकस आहार घेता यावा, या उद्देशाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत गर्भवती महिलांना तीन टप्प्यांत आर्थिक लाभ दिला जातो.
खामखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत खामखेडा, भऊर, सावकी, विठेवाडी या चार उपकेंद्रांचा समावेश आहे. या उपकेंद्रांतर्गत गत तीन वर्षांत ३८३ गर्भवती महिला लाभार्थींची नोंदणी झाली आहे. त्यांना टप्प्याटप्प्याने १९ लाख १५ हजार रु पयांचा लाभ मिळाल्याची माहिती खामखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदाकिनी दाणी आणि डॉ. जयश्री पगार यांनी दिली. देवळा तालुक्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ पहिल्या वेळेस गर्भवती राहणाऱ्या महिलांना घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी केले आहे.
ही योजना लाभार्थींपर्यंत पोहोचावी यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदाकिनी दाणी आणि डॉ जयश्री पगार यांच्या मार्गदर्शनाखाली आशा गटप्रवर्तक स्वाती जाधव या गटातील आशा कार्यकर्त्यांना सतत प्रोत्साहित करीत आहेत.
या योजनेतून तीन टप्प्यांत लाभ देण्यात येतो. पहिल्या टप्प्यात मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसांत गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर लाभार्थीच्या खात्यात एक हजार रु पये जमा केले जातात. दुसºया टप्प्यात किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर लाभार्थीच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केले जातात. तिसºया टप्प्यात प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकांचे प्राथमिक लसीकरण पूर्ण झाल्यानंतर लाभार्थीच्या खात्यात २००० रुपये जमा केले जातात. १ जानेवारी २०१७ ते ३१ जानेवारी २०२० या तीन वर्षांत खामखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाºया गावातून लाभार्थींची नोंदणी झाली आहे.