निफाड तालुक्यातील १३ गावे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 09:30 PM2020-03-31T21:30:29+5:302020-03-31T21:30:51+5:30
निफाड/लासलगाव : शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व कोरोना रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तालुक्यात आढूळन आलेल्या कोरोना संशयिताच्या पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यातील १३ गावे बंद करण्यात आली आहेत, अशी माहिती निफाडचे पोलीस उपअधीक्षक माधव रेड्डी यांनी दिली.

निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजीक, लासलगाव शहर, खडक माळेगाव, कोटमगाव, धारणगाव वीर, निफाड पोलीस ठाणे हद्दीतील नैताळे, सारोळे खुर्द, पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे हद्दीतील रानवड ही गावे कोरोना व्हायरस प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारीची उपाय योजना म्हणून सदर गावांना चारचाकी-दुचाकी वाहनाने अथवा पायी मार्गाने नागरिकांनी येणे-जाणे पूर्णत: बंद करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पोलीस व प्रशासनास सहकार्य करावे, तसेच कोणीही सोशल मीडिया अथवा इतर मार्गाने अफवा पसरवणार नाही याची खबरदारी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन निफाडचे पोलीस उपअधीक्षक माधव रेड्डी यांनी सांगितले. तालुक्याच्या विविध भागात निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबराव गावले यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळपासून अंगणवाडी सेविका आरोग्य कर्मचाऱ्यांनी तपासणी मोहीम अधिक गतिमान केली.