३० हजार ग्राहक महावितरणला स्वत: पाठवितात मीटर रीडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:12 AM2021-06-04T04:12:20+5:302021-06-04T04:12:20+5:30

नाशिक : कोरोनामुळे महावितरणकडून मीटर रीडिंग घेतले जात नसल्याने ग्राहकांनी आपल्या वीज मीटरचे रीडिंग स्वत: महावितरणला पाठवावे, असे आवाहन ...

30,000 customers send meter readings to MSEDCL themselves | ३० हजार ग्राहक महावितरणला स्वत: पाठवितात मीटर रीडिंग

३० हजार ग्राहक महावितरणला स्वत: पाठवितात मीटर रीडिंग

Next

नाशिक : कोरोनामुळे महावितरणकडून मीटर रीडिंग घेतले जात नसल्याने ग्राहकांनी आपल्या वीज मीटरचे रीडिंग स्वत: महावितरणला पाठवावे, असे आवाहन करीत ऑनलाईन यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून नाशिक परिमंडलातील सुमारे ३० हजार ग्राहक महावितरणला आपले स्वत:चे वीज मीटर रीडिंग ऑनलाईन पाठवित आहेत. विशेष म्हणजे एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात आठ हजार ग्राहक ऑनलाईन आले आहेत.

कोरोना संसर्गाच्या कालावधीत प्रत्यक्ष वीज मीटर रीडिंग न घेता महावितरणकडून सरासरी वीजबिले ग्राहकांना पाठविली जात आहेत. ग्राहकांना अचूक वीजबिल मिळावे यासाठी महावितरणने ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने मीटर रीडिंग पाठविण्याचे आवाहन केले आहे. महावितरणने दिलेल्या सुविधांचा वापर करीत स्वतःहून मीटरचे रीडिंग पाठविण्यास महावितरणच्या वीज ग्राहकांकडून दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत असून नाशिक परिमंडलात गेल्या एप्रिल महिन्यात २२,३३० ग्राहकांनी मोबाईल ॲप, वेबसाईट व ‘एसएमएस’द्वारे मीटरचे रीडिंग महावितरणकडे पाठविले होते, तर मे महिन्यात यामध्ये आठ हजारांनी वाढ होऊन रीडिंग पाठविण्यामध्ये नाशिक परिमंडलातील ३०,१४२ वीज ग्राहकांचा समावेश झाला आहे.

वीजग्राहकांना विविध प्रकारे स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्याची सोय महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या आपत्कालीन परिस्थितीत आता मोबाईल ‘एसएमएस’द्वारे देखील मीटर रिडींग पाठविण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीजजोडणीच्या मीटरचे फोटो रिडींग घेण्यात येत आहे. ग्राहकांना मीटरच्या रिडींगसाठी दरमहा निश्चित तारखेच्या एक दिवसआधी रिडींग पाठविण्याची ‘एसएमएस’द्वारे विनंती करण्यात येत आहे. तेव्हापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाईल अँप, (डब्लूडब्लूडब्ल डॉट महाडिस्कॉम डॉट इन) किंवा एसएमएस’द्वारे मीटरमधील केडब्लूएच (केडब्लूएच) रिडींग पाठविता येते.

--इन्फेा---

महावितरण मोबाईल अँपमध्ये ‘सबमीट मीटर रिडींग’वर क्लिक करून मीटरमधील केडब्लूएच (केडब्लूएच) रिडींगचा (केडब्लू किंवा केव्हीए वगळून) फोटो काढावा व सबमीट करावे. तसेच ग्राहक क्रमांकासोबत ग्राहक रजिस्ट्रेशन व लॉगीन करून (ब्लूडब्लूडब्ल डॉट महाडिस्कॉम डॉट इन) वेबसाईटवरून फोटो व मीटर रिडींग अपलोड करता येणार आहे. यासोबतच ‘एसएमएस’द्वारे मीटर रिडींग पाठविण्यासाठी ‘एसएमएस’ ९९३०३९९३०३ या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास मीटर रिडींग सबमीट करता येते.

वीजग्राहकांना स्वतःहून रिडींग पाठविल्यास रिडींगनुसार बिल आल्याची खात्री करता येईल, मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास त्याची तत्काळ तक्रार करता येईल, वीजबिलांबाबत कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत, रिडींग अचानक वाढल्यास त्याची कारणे शोधता येतील, वीजग्राहकांनी दरमहा मीटर रिडींग पाठवावे असे आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: 30,000 customers send meter readings to MSEDCL themselves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.