लासलगाव : लोकन्यायालयाद्वारे वादांचे तडजोडीने निराकरण करण्यासाठी आयोजित केलेल्या चळवळीला ग्रामीण भागात चांगले यश लाभत आहे. निफाड येथील जिल्हा सत्र न्यायालयात रविवारी झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात आठ समित्यांच्या माध्यमातून वादपूर्व व न्यायप्रविष्ट अशा एकूण २४ हजार ३९१ प्रकरणांपैकी ४२८९ प्रकरणे निकाली निघाली आहेत. सुमारे ४ कोटी ३५ लाख ५८ हजार ८९२ रु पयांची वसुली झाली आहे. निफाड येथील लोकन्यायालयात निफाडचे जिल्हा सत्र न्यायाधीश एस. सी. मगरे, निफाडचे जिल्हा सत्र न्यायाधीश ए. जी. मोहबे, निफाडचे जिल्हा सत्र न्यायाधीश पी. डी. दिग्रसकर, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश आर. आर. हस्तेकर, न्या. आर. एम. सातव व न्या. एस. बी. काळे, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. एस. कोचर, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. दुगावकर यांच्या अध्यक्षतेखाली लोकन्यायालय समित्यांद्वारे लोकन्यायालयाचे कामकाज सुरू झाले. लोकन्यायालय समितीवर सदस्य म्हणून अॅड. संजय दरेकर, अॅड. विजया जगताप, अॅड. विलास तासकर, अॅड. रामनाथ शिंदे, अॅड. सविता बडवर, अॅड. प्रभाकर केदार, शरद वाघ, नीलम निकम, श्रीकांत रायते, जयश्री पटाईत, अफरोज शेख, श्वेता घोडके, अरविंद बडवर, राहुल गायकवाड, लक्ष्मण वाघ, भावना चोरडिया यांनी कामकाज पाहिले, तर प्रशासकीय कामकाज पूर्णत्वाकरिता निफाडच्या जिल्हा न्यायालयाचे अधीक्षक किरण क्षीरसागर, सहायक अधीक्षक अशोक मोरे, सुनील पवार, दिवाणी न्यायालयाचे अधीक्षक अनंत काशिकर यांच्यासह सर्व न्यायालयीन कर्मचारी, ग्रामसेवक आदींनी विशेष परिश्रम घेतले.तडजोड झालेली प्रकरणेनिफाड विभागातील ८१ ग्रामपंचायतींच्या २२ हजार २९४ प्रकरणांपैकी ३ हजार ९९९ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. यात ८८ लाख ४७ हजार १७० रु पयांची करवसुली झाली आहे. त्याचबरोबर लोकनेते दत्ताजी पाटील बँक, बँक आॅफ महाराष्ट्र, भारतीय स्टेट बँक, लासलगाव मर्चंट बँक, देना बँक, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ बडोदा, महावितरण आदींच्या १४४५ प्रकरणांपैकी १६८ प्रकरणे निकाली निघाली. त्याद्वारे २ कोटी ९० लाख १८ हजार रु पये वसुली झाली आहे. न्यायप्रविष्ट ६५२ पैकी १२२ प्रकरणे निकाली निघाली आहेत. यात ५६ लाख ९३ हजार ७२२ रु पये वसुली झाली आहे. निफाड लोकन्यायालयात वादपूर्व व न्यायप्रविष्ट अशा सर्व ४ हजार २८९ प्रकरणांतून ४ कोटी ३५ लाख ५८ हजार ८९२ रु पये इतकी मोठी वसुली झाली आहे.
४ कोटी ३५ लाख ५८ हजार रु पयांची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:14 AM