इगतपुरी कोविड सेंटरला दिले ४ ऑक्सीजन कॉन्सेटंटर मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 12:37 AM2021-05-16T00:37:16+5:302021-05-16T00:39:01+5:30
घोटी : सध्या कोरोना महामारीमुळे लसींचा तुटवडा भासत आहे. रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळणे दुरापास्त होत असून रुग्णांचे हाल होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी ४, तसेच एकलव्य कोविड सेंटर येथे २ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन दिले.

बोडके यांनी गेल्या महिनाभरापासून स्वत: व अनेक फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी इगतपुरी, भावली, कोरपगाव आदी कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलिंडर, बेड, जनरेटर, इन्व्हर्टर आदी वस्तूंचा पुरवठा मोफत करीत आहे. आजही त्यांनी इगतपुरी शहराच्या ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला गोरख बोडके यांच्या माध्यमातून तैनवाला फाउंडेशनने ४ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या हस्ते देण्यात आले, तसेच एकलव्य कोविड सेंटर येथे २ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन दिले.
याप्रसंगी समाधान नागरे, गोरख बोडके, माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण, उपसरपंच अनिल भोपे, रामदास गव्हाणे, समाधान जाधव, अरुण भागडे, नीलेश काळे, विक्रम मुनोत, चंद्रकांत आडोळे, सिद्धेश्वर आडोळे, योगेश आडोळे, आदिनाथ आतकरी, डॉ. शेळके, डॉ. अक्षय मागाडे आदी उपस्थित होते.