नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शनिवारी (दि. २७) राज्यभरात घेण्यात आलेली महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेला नाशिकमधून १४ परीक्षा केंद्रावर ४ हजार २९२ उमेदवारांनी उपस्थित राहत कोरोनावर मात करून ही परीक्षा दिली.महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेसाठी नाशिक जिल्ह्यात ६ हजार १८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापैकी ४ हजार २९२ उमेदवारांनी परीक्षा दिली. तर सुमारे १ हजार ७२६ परीक्षार्थी विविध कारणांनी अनुपस्थित राहिल्याची माहिती सुत्रांनी दिली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य सेवा पूर्व परीक्षेप्रमाणे अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेकरीता मार्गदर्शक तत्वे जारी केले होते.तसेच कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांवर विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे उमेदवारांनाही कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार परीक्षार्थींना त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करुन सोबत आणणे अनिवार्य करण्यात आले होते.
४ हजार २९२ उमेदवारांनी दिली अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 1:29 AM