शहरात ४० नाकाबंदी पॉइंट; पोलीस उतरणार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 07:08 PM2021-05-11T19:08:33+5:302021-05-11T19:10:57+5:30

पालकमंत्री छगन भुजबळ यांनीदेखील याबाबत नाशिककरांना आवाहन करत लॉकडाऊन यशस्वी करण्याची साद घातली आहे

40 blockade points in the city; Police will take to the streets | शहरात ४० नाकाबंदी पॉइंट; पोलीस उतरणार रस्त्यावर

शहरात ४० नाकाबंदी पॉइंट; पोलीस उतरणार रस्त्यावर

Next
ठळक मुद्देअनावश्यक कारणासाठी घराबाहेर येऊ नका लॉकडाऊनची कडक अंमलबाजवणी

नाशिक : शहर व परिसरात बुधवारपासून लॉकडाऊन येत्या २३ तारखेपर्यंत जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याकरिता शहर पोलीस, ग्रामीण पोलीस दल सज्ज झाले आहे. शहरात सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील फिक्स पॉइंट, तात्पुरते पॉइंट मिळून सुमारे ४० ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तालयाच्या सुत्रांनी सांगितले. नागरिकांनी केवळ वैद्यकिय कारणांसाठीच घराबाहेर पडावे, अनावश्यकरित्या घराबाहेर पडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

शहरात वाढता कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सर्वानुमते बारा दिवसांचा कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला गेला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनीदेखील याबाबत नाशिककरांना आवाहन करत लॉकडाऊन यशस्वी करण्याची साद घातली आहे. दरम्यान, अंशत: लॉकडाऊन काळात नियमांच्या अंमलबजावणीत असलेली शिथिलता आता दिसणा नसून नियम आणि अंमलबजावणी कठोर करण्यात आली आहे. शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कोठेही कोणत्याही कारणास्तव नागरिकांची गर्दी होणार नाहीआणि सोशल डिस्टन्स धोक्यात येणार नाही, यासाठी चोख नियोजन करण्याचे आदेश पोलीस आयुक्त दिपक पांडेय यांनी दिले आहे. शहरात ४० नाकाबंदी पाँईट्स लावण्यात आले आहे. ही संख्या मोठी असून, नाकाबंदी पाँईट्समध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येतील. यापूर्वी शहरात नाकाबंदी पाँईट्स होते. मात्र, येथे नागरिकांना अडविण्यात येत नव्हते. आपत्तकालीन परिस्थितीमध्ये घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना अडचण येऊ नये यासाठी चौकशी, कारवाई करण्यात येत नव्हती. मात्र, प्रशासनाच्या या निर्णयाचा गैरफायदा घेण्यास सुरूवात झाली. बुधवारी दुपारी १२ वाजेनंतर मात्र कोणतीही सुट मिळणार नाही. नागरिकांना नियमांचे पालन करावेच लागणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पोलीस उपआयुक्त, सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पोलीस निरिक्षक, उपनिरिक्षकांवर चोख बंदोबस्त व नाकाबंदीची भीस्त पाण्डेय यांनी सोपविली आहे.

Web Title: 40 blockade points in the city; Police will take to the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.