नाशकात अकरावी प्रवेशासाठी पहिल्याच दिवशी ४०९ अर्ज लॉक ; २०५ अर्जांची पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 09:14 PM2020-08-01T21:14:02+5:302020-08-01T21:15:48+5:30
दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेंतर्गत शनिवार (दि.१) पासून आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून नाशिकमध्ये पहिल्याच दिवशी ४०९ विद्यार्थ्यांनी त्यांच्या आॅनलाईन अर्जाचा भाग एक भरून लॉक केला आहे
नाशिक : दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेंतर्गत शनिवार (दि.१) पासून आॅनलाइन अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून नाशिकमध्ये पहिल्याच दिवशी ४०९ विद्यार्थ्यांनी त्यांच्या आॅनलाईन अर्जाचा भाग एक भरून लॉक केला आहे. तर त्यापैकी २०५ विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी पक्रियाही पूर्ण झाली आहे.
नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील ६० कनिष्ठ महाविद्यलाये व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी उपलब्ध एकूण २५ हजार २५० जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. शिक्षण विभागाने सुधारित वेळापत्रकानुसार प्रवेशअर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया शनिवारपासून झाली आहे. परंतु, या प्रक्रियेत काही विद्यार्थ्यांना आॅनलाईन शुल्क भरण्यात अडचणी आल्याच्या तक्रारी पालकांकडून करण्यात आल्या तर काही विद्यार्थ्यांना संकेतस्थळाच्या संथगतीमुळे आॅनलाईनचा भाग एक भरण्यात अडचणी येत असल्याने काही पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, शहरातील अकरावी प्रवेशासाठी संकेतस्थळावर शनिवारी (दि.१) सायंकाळपर्यंत २१ हजार ९५२ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही अशा विद्यार्थ्यांनाही आॅनलाईन नोंदणी करून आॅनलाईन अर्जाचा भाग एक भरता येणार आहे.