नाशिक जिल्ह्यातून 42 हजार 688 विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 06:53 PM2018-02-18T18:53:43+5:302018-02-18T18:56:43+5:30
प्राथमिक शिक्षण विभागातर्फे रविवारी (दि.18) घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेला जिल्हाभरातून 42 हजार 688 विद्यार्थ्यांनी उपस्थिीती लावून दोन सत्रांमध्ये ही परीक्षा दिली. पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी यंदा प्रथमच प्रत्येकी दीड तासांच्या बहुपर्यायी स्वरुपातील दोन प्रश्नप्रत्रिका सोडवाव्या लागल्या
नाशिक : प्राथमिक शिक्षण विभागातर्फे रविवारी (दि.18) घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेला जिल्हाभरातून 42 हजार 688 विद्यार्थ्यांनी उपस्थिीती लावून दोन सत्रांमध्ये ही परीक्षा दिली. यात पाचवीतील 24 हजार 122 व आठवीतील 19 हजार 51 विद्याथ्यार्ंनी ही परीक्षा दिली असून दोन्ही गटातील परीक्षा गणीत विषय वगळता परीक्षा अतिशय सोपी गेल्याची प्रतिक्रीया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी यंदा प्रथमच प्रत्येकी दीड तासांच्या बहुपर्यायी स्वरुपातील दोन प्रश्नप्रत्रिका सोडवाव्या लागल्या. सकाळी साडेआकरा वाजता पहिल्या सत्रात प्रथम भाषा व गणित विषयाचे पेपर झाले. तर दुसऱ्या सत्रात दिड ते तीन वाजेच्या कालावधीत तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी विषयाचा पेपर झाले. दुसऱ्या सत्रातील गणित विषयाच्या पेपरमध्ये काही अवघड प्रश्न कठीण पातळीचे होते. तर बुध्दीमत्ता व सर्वसामान्य ज्ञानाची प्रश्नपत्रीका सोपी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा सोपी गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. परीक्षेसाठी 24 हजार 122 विद्यार्थी हजर होते. तर 636 विद्यार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारली तर आठवीच्या 18 हजार 566विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी, सिंधी आदी भाषांतील कार्बनलेस उत्तरपत्रिका मिळाल्याने एमपीएससी स्पर्धा परीक्षांप्रमाणो विद्यार्थ्यांना उत्तर पत्रीका सोबत मिळाली. शिष्यवृत्ती पात्रतेसाठी या परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरमध्ये किमान 40 टक्के गुण मिळविणो आवश्यक आहे. दरम्यान, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी शहरातील डी. डी. बिटको हायस्कूल, मराठा हायस्कूल, अभिनव बाल विकास मंदीर, होरायझन शाळेतील परीक्षा केंद्रांना भेट दिली. जिल्हा समन्वयक म्हणून प्रमोद चिंचोले, सी. बी. गवळी, उपशिक्षणाधिकारी एल. डी. सोनवणो यांनी जबाबदारी सांभाळली.