लॉकडाऊनच्या काळातही सिव्हीलमध्ये ४४५७ शस्त्रक्रिया !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 12:13 AM2020-06-22T00:13:27+5:302020-06-22T00:15:56+5:30

जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ज्यावेळी कोणत्याच शस्त्रक्रिया होत नव्हत्या, त्यावेळी नाशिक जिल्हा रुग्णालयात तब्बल ४,४५७ शस्त्रक्रिया पार पाडून जनसामान्यांना जीवनदान देण्यात आले आहे. या शस्त्रक्रियांमध्ये लहान, मोठ्या, गंभीर शस्त्रक्रियांसह सीझर पद्धतीने केलेल्या बाळंतपणांचादेखील समावेश आहे.

4457 surgeries in civil even during lockdown! | लॉकडाऊनच्या काळातही सिव्हीलमध्ये ४४५७ शस्त्रक्रिया !

लॉकडाऊनच्या काळातही सिव्हीलमध्ये ४४५७ शस्त्रक्रिया !

googlenewsNext
ठळक मुद्देसेवा परमोधर्म : कोरोना काळातही लहान-मोठ्या स्वरूपाच्या आॅपरेशन्सची कर्तव्यपूर्ती

नाशिक : जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ज्यावेळी कोणत्याच शस्त्रक्रिया होत नव्हत्या, त्यावेळी नाशिक जिल्हा रुग्णालयात
तब्बल ४,४५७ शस्त्रक्रिया पार पाडून जनसामान्यांना जीवनदान देण्यात आले आहे. या शस्त्रक्रियांमध्ये लहान, मोठ्या, गंभीर शस्त्रक्रियांसह सीझर पद्धतीने केलेल्या बाळंतपणांचादेखील समावेश आहे.
मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात नाशिकमध्ये सर्वत्र लॉकडाऊन झाल्यापासून खासगी रुग्णालयांमधील शस्त्रक्रिया ठप्प झाल्या होत्या. केवळ काही मोजक्याच खासगी रुग्णालयांत तातडीच्या शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. खासगी रुग्णालये एकतर शस्त्रक्रिया पुढे ढकलत होते किंवा त्याबाबत काहीच प्रतिसाद देत नव्हते. अशा परिस्थितीत जिल्हा शासकीय रुग्णालयच कामाला आले.
मार्च महिन्यात जिल्हा रुग्णालयात मोठ्या ३७७, तर लहान एक हजार २३९ शस्त्रक्रिया,४३२ सामान्य तर २४९ सिझर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यानंतर एप्रिल महिन्यात कडकडीत लॉकडाऊन पाळला जात असतानाच्या काळातही तातडीच्या ७८ मोठ्या, ४९५ छोट्या, २२७ सामान्य, तर १८३ प्रसूती सिझरने करण्यात आल्या होत्या.
त्यानंतर खासगीमध्ये पूर्णपणे ठप्प असतानाच्या मे महिन्यात ६९ मोठ्या, ६०४ छोट्या, २८१ सामान्य आणि १५३ सिझर करण्यात आल्या. जून महिन्यातही तातडीच्या, लहान-मोठ्या शस्त्रक्रियांचा क्रम अव्याहतपणे सुरूच आहे.
जिल्हा रुग्णालयातील ४५ वैद्यकीय अधिकारी आणि १२० परिचारिका आणि अन्य सहायक कर्मचाऱ्यांचे त्यासाठी योगदान मिळत आहे. या शस्त्रक्रिया करताना सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी पूर्ण खबरदारी बाळगून शस्त्रक्रिया पार पाडत आहेत.

Web Title: 4457 surgeries in civil even during lockdown!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.