मालेगाव: शहरात कोरोनावर आरोग्य विभागाने नियंत्रण आणले असले तरी गेल्या काही दिवसांपासून बाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली असून महापालिका क्षेत्रात शहरात आज ४८ बाधित तर तालुक्यात ग्रामीण भागात त्याच्या निम्मे म्हणजे २५ बाधित उपचार घेत आहेत.
शहरातसह तालुक्यात आतापर्यंत १२ हजार ६२२ बाधित मिळून आले आहेत. त्यपैकी १२ हजार २१७ जण पूर्णपणे बरे झाले आहेत. मात्र ३५७ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. शहरात नागरिक तोंडाला मास्क न वापरता फिरत असून अनेक ठिकाणी गर्दी करत आहेत. बाजारपेठांमध्ये नागरिक मोठी गर्दी करीत असून विवध राजकीय आणि सामाजिक संस्थांच्या कार्यक्रमांमध्येही नागरिक मुखपट्टी न लावता गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहेत.गेल्या दोन महिन्यापूर्वी मनपा क्षेत्रात तब्बल दोन हजारांवर बाधितांची संख्या होती. त्यावर नियंत्रण मिळविलेले असताना आणि आता सर्वत्र तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात असताना शहरातील बेफिकीर नागरिकांवर कारवाई करण्याची वा त्यांना समज देण्याची आवश्यकता आहे..