नाशिक : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. रविवारी (दि.१४) १ हजार ३५६ नवे कोरोनाबाधित जिल्ह्यात आढळून आले आहे. यापैकी शहरात ९४२ नवे रुग्ण आढळले, तसेच ५२३ रुग्णांनी दिवसभरात कोरोनावर मात केली. रविवारी कोरोनाबाधित रुग्णांपैकी दोन रुग्ण दगावल्याने मृत्यूचा आकडा वाढून २ हजार १७० झाला आहे. दिवसभरात जिल्ह्यात १ हजार ६३१ नवे रुग्ण वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये दाखल झाले आहेत. सध्या ८ हजार ४८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. २ हजार ४९४ कोरोना नमुना चाचणी अहवाल प्रगतिपथावर आहेत. यापैकी शहरातील १ हजार ५९१ तर ग्रामीण भागातील ६१९ अहवालांची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात मागील वर्षभरापासून आतापर्यंत १ लाख ३३ हजार ५९० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर १ लाख २३ हजार ३७२ रुग्ण कोरोनावर मात करण्यास यशस्वी झाले आहे. जिल्ह्यात पूर्णपणे रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९२.३५ इतकी आहे.
नाशकात ५२३ रुग्णांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 1:36 AM