पंचवटीतून नायलॉन मांजाचे ५७ गट्टू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:35 AM2021-01-13T04:35:15+5:302021-01-13T04:35:15+5:30

नायलॉन मांजाविक्री व वापरावर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत बंदी घातली आहे. नायलॉन मांजा विक्रीच्या ...

57 bundles of nylon cats seized from Panchavati | पंचवटीतून नायलॉन मांजाचे ५७ गट्टू जप्त

पंचवटीतून नायलॉन मांजाचे ५७ गट्टू जप्त

Next

नायलॉन मांजाविक्री व वापरावर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत बंदी घातली आहे. नायलॉन मांजा विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगणे तसेच चोरट्या मार्गाने वाहतूक व साठवणूक करणे गुन्हा असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. मात्र मकरसंक्रांत जवळ येऊ लागताच शहरात पुन्हा नायलॉन मांजाच्या चोरट्या विक्रीला उधाण येऊ लागल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. गुन्हे शाखांकडून यावर ‘वॉच’ ठेवला जात आहे.

दिंडोरी रोडवरील कलानगर भागात चोरट्या मार्गाने नायलॉन मांजाची सर्रासपणे विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली यानुसार पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, गौरव खांडरे, प्रवीण चव्हाण यांच्या पथकाने कलानगर येथील साई रेसिडेन्सी रो-हाऊसच्या परिसरात सापळा रचला. यावेळी संशयित सूरज फकिरा खोडे (२७, रा. कलानगर) हा नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी आल्याने पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून नायलॉन मांजाचे ५८ गट्टू मिळून आले. संशयित खोडेविरोधाात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास म्हसरूळ पोलीस करीत आहेत.

Web Title: 57 bundles of nylon cats seized from Panchavati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.