जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे ५८ हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 11:46 PM2021-03-31T23:46:16+5:302021-04-01T01:00:59+5:30
नाशिक: जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असल्याचे चित्र दिसत असले तरी, त्यामागे संशयित रुग्णांची अँटिजेन चाचणी हेच एकमेव कारण असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे असून, ज्या भागात सातत्याने कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळत आहेत, असे जिल्ह्यातील ग्रामीण भागात ५८ हॉटस्पॉट जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने निश्चित केले आहे. या भागावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करून आरोग्य विभाग घरोघरी जाऊन अँटिजेन चाचणी करीत आहेत.

या हॉटस्पॉटमध्ये प्रामुख्याने सर्वाधिक हॉटस्पॉट नांदगाव तालुक्यात सात असून, त्या खालोखाल सिन्नर, देवळा येथे सहा तर पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्वर ही आदिवासी तालुके वगळता उर्वरित तालुक्यांमध्ये प्रत्येकी पाच हॉटस्पॉट निश्चित करण्यात आलेले आहेत. त्यात सातत्याने ज्या भागात कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत अशा भागांवर लक्ष केंद्रित करून या हॉटस्पॉटसाठी १८१८ वैद्यकीय पथके औषधे, साहित्यानिशी तैनात करण्यात आलेले आहेत. संपूर्ण ग्रामीण जिल्ह्यात ८४२४ कोरोना बाधित रुग्ण आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींपासून पुन्हा त्याचा संसर्ग वाढू नये म्हणून अशा व्यक्तींची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी वैद्यकीय पथक घरोघरी जाऊन चाचणी घेणार असून, त्यातही अँटिजेन चाचणीचे प्रमाण ७५ टक्के तर आरटीपीसीआरचे प्रमाण २५ टक्के असणार आहे. अँटिजेन चाचणीचा अहवाल तत्काळ मिळत असल्याने अशा संशयितांवर तत्काळ उपचार करणे सोपे जाणार असून, बाधितांनानजीकच्या कोविड केअर सेंटर किंवा कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.