१७ जागांसाठी ६१ उमेदवार रिंगणात

By admin | Published: November 11, 2016 11:04 PM2016-11-11T23:04:33+5:302016-11-11T23:16:04+5:30

१७ जागांसाठी ६१ उमेदवार रिंगणात

61 candidates for 17 seats in the fray | १७ जागांसाठी ६१ उमेदवार रिंगणात

१७ जागांसाठी ६१ उमेदवार रिंगणात

Next

नांदगाव : नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार आजमावणार नशीबनांदगाव : नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवारांनी व प्रभागातून ११ जणांनी माघार घेतल्याने नगराध्यक्षपदासाठी पाच व आठ प्रभागांमधील १७ जागांसाठी ६१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. माघारीचा दिवस अनपेक्षित माघारींनी गाजला. भाजपा व शिवसेनेच्या एकेक उमेदवाराने माघार घेतली. सकाळी ११ वाजेपासून नगरपरिषद परिसरात मोठी गर्दी जमली होती. कोण माघार घेतंय याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेनेच्या समर्थकांव्यतिरिक्त इतर पक्षांचे कार्यकर्ते तुरळक होते. परंतु लढतींचे चित्र स्पष्ट झाले. प्रत्येक पक्षाला विशेषत: भाजपाला बंडखोरीचा फटका बसणार असल्याचे अधोरेखित झाले.
माघारीच्या तडजोडी पडद्याआड झाल्या असून, त्याची वाच्यता जाहीर करण्यात येत नसली तरी त्यामागील मतांची गणिते सुरू आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी, भाजप व शिवसेना अशा तिरंगी लढती ठिकठिकाणी होत आहेत. नगराध्यक्षपदाची लढत पंचरंगी होणार आहे. नगराध्यक्षपदासाठी रिंगणात राहिलेले उमेदवार राजेश कवडे (शिवसेना), अरुण पाटील(राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष), संजय सानप (भाजप),शिवाजी पाटील (अपक्ष), कल्पना वाघ (अपक्ष) असे आहेत.
प्रभाग क्र. १ मध्ये संगीता जगताप
(१ अ) (कॉँग्रेस), इंदिरा बनकर (१ अ) (भाजपा), कांचन काकळीज (१ अ) (शिवसेना), वाल्मीक टिळेकर (१ ब) (राष्ट्रवादी ), सुरेश शेळके (१ ब), (भाजपा), नरेंद्र पाटील (अपक्ष), नितीन जोशी (अपक्ष).
प्रभाग क्र. २ मध्ये सुरेश गायकवाड (२अ) (राष्ट्रवादी), लीलावती महाजन (२अ),(भाजप), अभिषेक सोनवणे(२ अ ) (शिवसेना), चिंतामण आहेर (अपक्ष), कमलेश पेहरे (अपक्ष) नंदा कासलीवाल (२ब) (काँग्रेस), राखी मोकळ(२ब) (शिवसेना), संगीता जाधव (अपक्ष), शाहिस्ता माजीद सैयद (अपक्ष)
प्रभाग क्र. ३ मध्ये करुणा जाधव
(३ अ) (काँग्रेस), निर्मला केदारे (३ अ) (भाजपा), कामिनी साळवे (३ अ) (शिवसेना), साक्षी आहिरे (राष्ट्रवादी), सचिन देवकाते (३ ब) (राष्ट्रवादी), राजेंद्र गांगुर्डे (३ ब) (भाजपा), कारभारी शिंदे (३ब) (शिवसेना), देवीदास भोपळे (भाकप), संतोष वाघ (अपक्ष) प्रभाग क्र. ४ मध्ये प्रगती निकम (४ अ) (भाजप), चांदनी खरोटे (४ अ) (शिवसेना), सुमीत गुप्ता
(४ ब) (काँग्रेस), प्रशांत संत (४ ब) (भाजपा), शोभा कासलीवाल (४ ब) (शिवसेना), शिवाजी पाटील (अपक्ष), राकेश बागोरे (अपक्ष).
प्रभाग क्र. ५ मध्ये विशाल खैरनार (५अ)(काँग्रेस), संजीव वाघ (५अ) (भाजप), किरण देवरे (५ अ) (शिवसेना) अक्का सोनवणे (५ ब) (काँग्रेस), वंदना कवडे (५ ब) (शिवसेना).
प्रभाग क्र. ६ मध्ये शारदा चव्हाण (६ अ) (काँग्रेस), सुनीता सोनवणे (६ अ) (भाजप), सविता शेवरे (शिवसेना), सुरज पाटील (६ ब) (काँग्रेस), राहुल आहिरे (६ब) (भाजप), मनीषा काकळीज (६ ब) (शिवसेना).
प्रभाग क्र. ७ मध्ये वनिता पाटील (७ अ) (राष्ट्रवादी), संगीता उगले (७ अ) (भाजपा), सरस्वती गिते (७ अ) (शिवसेना). शेख बालेमिया अब्दुल (७ ब) (राष्ट्रवादी), उमेश उगले (७ ब) (भाजप), शेख फैज गफार शेख (७ब) (शिवसेना), संतोष भोसले (अपक्ष)
प्रभाग क्र. ८ मध्ये काका सोळसे(८अ)(राष्ट्रवादी), प्रकाश थोरात (८अ)(भाजप), नितीन जाधव(८अ) (शिवसेना), नीलोफर बेग(अपक्ष) सीमा राजुळे (८ब)(राष्ट्रवादी), दगूबाई सानप (८ब) (भाजप), सुनंदा पवार(८ब) (शिवसेना). योगीता गुप्ता (८क) (राष्ट्रवादी), शशीकला बागोरे (८क) (भाजप), परिघाबाई शिंदे(८क) (शिवसेना), आशाबाई पाटील (अपक्ष).
प्रभाग क्र. १ ब मध्ये शिवसेना उमेदवार रविंद्र पैठणकर यांनी अपक्ष उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यासाठी माघार घेतली. पाटील यांनी भाजपचे तिकीट मागितले होते पण त्यांना ते मिळाले नव्हते. भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या माजी आमदार संजय पवार यांचे ते कट्टर समर्थक आहेत.
भाजपकडून नगराध्यक्षपदाचे दावेदार हेमांगी देशमुख यांचे तिकीट शेवटच्या क्षणी कापले गेल्याने नाराज झालेल्या विलासराव देशमुख यांच्या पत्नी हेमांगी यांनी प्रभाग क्र. २ ब मधून माघार घेतली. त्यांना भाजपने प्रभागासाठी एबी फॉर्म दिला होता. नगराध्यक्ष पदासाठीचे अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांना मनविण्याचे इतरांचे प्रयत्न अयशस्वी झाले. यावर आज शिक्कामोर्तब झाले. ते नगराध्यक्षपद व प्रभाग क्र. ४ या दोन ठिकाणी आपले नशीब अजमावत आहेत. (वार्ताहर)

Web Title: 61 candidates for 17 seats in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.