जिल्हा न्यायालयात आयोजित लोकन्यायालयात शनिवारी (दि. २५) नाशिक जिल्ह्यातून न्यायालयात दाखल झालेल्या प्रलंबित प्रकरणांपैकी १८,१८९ प्रकरणे ठेवण्यात आली हाेती व दावा दाखलपूर्व एकूण एक लाख, ४६ हजार २०९ प्रकरणे होती. न्यायालयात प्रलंबित असलेल्या कलम १३८ म्हणजेच धनादेश न वटण्याची ५६२ प्रकरणे, फौजदारी २१५०, बँकेची १२४, मोटार अपघाताचे १६८, कामगारविषयक १५, कौैटुंबिक वादाची १८८, भूसंपादनविषयक २१ व दिवाणी दावे १७० व इतर ५९ अशी ५४५७ प्रकरणे लोकन्यायालयात निकाली काढण्यात आली. दावा दाखलपूर्व प्रकरणांपैकी १८,६४५ प्रकरणे निघाली असून, मोटार वाहनाच्या थकीत ई-चलन प्रकरणांमध्ये ८७३२ प्रकरणांमधून ६७,७७,७५० इतकी रक्कम दंडापोटी वसूल करण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या अदालतीत प्राधिकरणाचे सचिव प्रसाद कुलकर्णी, वकील संघाचे अध्यक्ष नितीन ठाकरे यांच्यासह जिल्हा न्यायालयातील वकिलांनी सहभाग नोंदविला.
चौकट===
नाशिक रोडला २१४ प्रकरणे निकाली
नाशिक रोडच्या न्यायालयात
नाशिक रोड दिवाणी व फौजदारी न्यायालयात नियमित दिवाणी व फौजदारी अशी ७२० प्रकरणे ठेवण्यात आली होती. १५२ प्रकरणे निकाली निघाली. दाखलपूर्व प्रकरणे एकूण ३३६२ पैकी ६२ निकाली आहेत. असे एकूण २१४ प्रकरणे निकाली निघाली. यासाठी दोन पॅनल करण्यात आले होते. त्यात न्या. ए. एन. सरक, न्या. एम.एस. बोराळे न्या. डी. डी. कर्वे यांच्यासह ॲड. जे. के. चहल, सुदाम गायकवाड, प्रकाश गायकर, सुनील शितोळे, बी. बी. आरणे, संग्राम जुंद्रे, दमयंती दोंदे, प्रमोद कासार, महेश गायधनी, सुरेश कोठुळे, विकास घुमरे, विलास ताजनपुरे आदींनी भाग घेतला.