प्रवासी महिलेचे ७० हजारांचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:25 AM2019-06-04T00:25:00+5:302019-06-04T00:25:59+5:30
नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सावित्रीबाई शिवदास चौधरी (६०) या त्र्यंबक नाका येथून रिक्षामध्ये बसल्या. दरम्यान, गडकरी चौक ते इंदिरानगर बोगद्याच्या दरम्यान, रिक्षामधील अन्य तिघा सहप्रवासी भामट्यांनी त्यांचे लक्ष विचलित करून बॅगेत ठेवलेले ७० हजार रुपये किमतीच्या सोनसाखळ्या हातोहात लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.
नाशिक : नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सावित्रीबाई शिवदास चौधरी (६०) या त्र्यंबक नाका येथून रिक्षामध्ये बसल्या. दरम्यान, गडकरी चौक ते इंदिरानगर बोगद्याच्या दरम्यान, रिक्षामधील अन्य तिघा सहप्रवासी भामट्यांनी त्यांचे लक्ष विचलित करून बॅगेत ठेवलेले ७० हजार रुपये किमतीच्या सोनसाखळ्या हातोहात लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.
चौधरी या पाहुण्या म्हणून आल्या असून, त्या शनिवारी (दि. १) सायंकाळच्या सुमारास रिक्षामधून प्रवास करत होत्या. मुंबई नाका पोलिसांच्या हद्दीतील गडकरी चौक सिग्नल ते इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकच्या दरम्यान रिक्षामध्ये बसलेल्या अनोळखी तिघा इसमांपैकी एका भामट्याने संगनमताने चौधरी यांचे लक्ष विचलित करून त्यांच्या बॅगेमध्ये ठेवलेली ३ तोळे वजनाची ६० हजारांची सोनसाखळी, १० हजार ५०० रुपये किमतीची १७ ग्रॅमची पॅन्डल असलेली सोन्याची पोत असा एकूण ७० हजार ५०० रुपयांचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याची तक्रार त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दिली आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.