जिल्ह्यात ८३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 02:02 AM2021-08-02T02:02:31+5:302021-08-02T02:03:13+5:30
जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट कमी असल्याचा दिलासा असला तरी ग्रामीण भागातील रुग्ण संख्या कमी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. रविारी जिल्ह्यात ८३ नव्या कोरोनाबाधितांची नाेंद झाली असून त्यातील ४० रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत.
नाशिक : जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट कमी असल्याचा दिलासा असला तरी ग्रामीण भागातील रुग्ण संख्या कमी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. रविारी जिल्ह्यात ८३ नव्या कोरोनाबाधितांची नाेंद झाली असून त्यातील ४० रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शून्य ते ३ इतकी कोरोना रुग्णांची संख्या असून यामध्ये आदिवासी तालुक्यांचा समावेश आहे. सुरगाणा, पेठ, कळवण या तालुक्यांमध्ये समाधानकारक परिस्थिती असून हे तालुके कोरोनामुक्त होत आहेत. रविवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार नाशिक महापालिका हद्दीत ३५, ग्रामीण भागात ४०, मालेगाव मनपा क्षेत्रात केवळ २ तर जिल्हाबाह्यमध्ये ६ इतके पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. दिलासादायक म्हणजे रविवारी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ७८ इतकी आहे. चार मृत्यूंची नोंद रविवारी करण्यात आली. त्यामध्ये नाशिक ग्रामीणमधील तीन तर मनपा हद्दीतील एका रुग्णाचा समावेश आहे.