कोट -
दिवसभर फिरून व्यवसाय केला, तर चारशे ते पाचशे रुपये रोज सुटतो, त्यावरच पत्नी, दोन मुले असे आमचे चौघांचे कुटुंब चालते. आता कडक निर्बंधामुळे शहरात फिरणे कठीण होणार असल्याने घरखर्च चालवायचा कसा आणि मुलांचे शिक्षण कसे करायचे, याची चिंता लागली आहे.
- सुनील सोनवणे
कोट-
वाढत्या महागाईत चौघांचे कुटुंब चालविण्यासाठी लागणारा खर्च आणि राज्य शासनाकडून मिळणारी मदत पाहता, पंधराशे रुपये किती दिवस पुरणार. ही तुटपुंजी मदत देण्यापेक्षा शासनाने निश्चित वेळेत का होईना, पण व्यवसायाला परवानगी द्यावी
- राजेंद्र गरुड
कोट -
शासन केवळ नोंदणी केलेल्या फेरीवाल्यांनाच मदत देणार आहे, पण नोंदणी नसतानाही शहरात व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठी आहे, अशा फेरीवाल्यांंना शासनाने वाऱ्यावरच सोडले आहे. घरभाडे, वीजबिल, घरखर्च यांचा ताळमेळ बसवायचा कसा, दररोज माल विकला, तर किमान दोन पैसे मिळतात, तेव्हा चूल पेटते, आता १५ दिवस करायचे काय?
- युवराज शर्मा
चौकट-
शहरातील नोंदणीकृत फेरीवाल्यांची संख्या ९,०००
चौकट-
व्यवसाय बंद असल्यामुळे घरमालक घरभाडे काही माफ करणार नाही. आता घरभाडे द्यायची की घरखर्च भागवायचा, ही सर्वात मोठी समस्या आहे.