नाशिक : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीसह अन्य लहान-मोठ्या नद्यांची पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने नैसर्गिक आपत्ती विभागाने जिल्ह्यातील ९२ गावे पूरबाधीत असल्याचे जाहीर केले आहे. या ९२ गावांमधील ग्रामसेवकांना सावधानता बाळगण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी द्यावेत, यासाठी सोमवारी (दि. ११) १५ गटविकास अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अतिदक्षतेचे आदेश दिले आहेत.सोमवारी मिलिंद शंभरकर यांनी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांच्यासह खातेप्रमुखांची बैठक घेऊन जिल्ह्णातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. त्यात जिल्हाधिकारी कार्यालयाने पूरबाधीत होऊ शकणाऱ्या संभाव्य गावांची यादी जिल्हा परिषदेला दिली आहे. या यादीनुसार जिल्ह्यातील नाशिक, इगतपुरी, दिंडोरी, मालेगाव, देवळा, निफाड, येवला आदि तालुक्यांतील ९२ गावांमध्ये पूरपरिस्थितीत काय काळजी घ्यावी, काय दक्षता घ्यावी याबाबत सूचना देत आवश्यक ते नियोजन करण्याचे आदेश दिले. जिल्ह्णातील या ९२ गावांची प्रकल्पनिहाय यादी अशी- गंगापूर प्रकल्प- डावा तीर- जलालपूर, नाशिक, नांदूर, मानूर, पंचक, ओढा, लाखलगाव, दारणासांगवी, बोेंडेगाव, कोठुरे, काथरगाव, चेहेडी, वऱ्हेदारणा, लालपाडी, शिंपीटाकळी, गंगापूर उजवा तीर- गोवर्धन, गंगापूर, आनंदवली, दसक-पंचक, एकलहरे, गंगापाडळी, पालवी, सावळी, गंगावाडी, चांदोरी, सायखेडा, शिंगवे, करंजगाव, चापडगाव, मांजरगाव, चाटोरी, दारणा प्रकल्प-डावा तीर- भगूर, संसरी, बेलतगव्हाण, चेहेडी, चाडेगाव, सामनगाव, कोटमगाव, हिंगणवेढे, दारणासांगावी, उजवा तीर- साकूर, शेणीत, वेळू, राहुरी, दोनवाडे, मानेगाव, शेवगेदारणा, पळसे, बाभळेश्वर, जाखोरी, जोगलटेंभी, कडवा प्रकल्प- डावा तीर- पिंपळगाव डुकरा, शेणीत, उजवा तीर- पिंपळगाव घाडगा, बेलू, भोजापूर प्रकल्प- डावा तीर- चास, नळवाडी, गुंजाळवाडी, संगमनेर, वल्हाळे, उजवा तीर- कासारवाडी, चिकनी, निमगाव(क), राजापूर, पालखेड प्रकल्प- लोखंडेवाडी, जोपूळ, पालखेड, राजापूर, रौळस, कुंदेवाडी, निफाड, करंजवण प्रकल्प- लखमापूर, परमोरी, करंजवण, ओझे, ओझरखेड प्रकल्प- ओझरखेड, वलखेड, आंबेवाडी, करंजी, वाघाड प्रकल्प- वाडा, वलखेड, हातनोरे, निळवंडी, दिंडोरी, पिंपळगाव केतकी, तिसगाव प्रकल्प- तिसगाव, खेडगाव, पुणेगाव प्रकल्प- पुणेगाव, चणकापूर प्रकल्प- लोहोणेर, मालेगाव आदि ठिकाणांचा समावेश आहे. या पूरबाधीत गावांमध्ये व ठिकाणांमध्ये अतिवृष्टीच्या वेळी आवश्यक ती काळजी घेण्याबरोबरच नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याबाबत आवश्यक ते नियोजन करण्याच्या सूचना गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील ९२ गावे पूरबाधीत
By admin | Published: July 12, 2016 12:10 AM