विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहर व जिल्हाभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने दिवसागणिक रुग्णसंख्येत मोठ्या पटीने वाढ होत आहे. रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढत आहे. अनके संशयित रुग्ण तपासणीपासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी संशयित रुग्णांची आरटीपीसीआर व ॲन्टीजेन चाचणी करण्यात येते. मात्र, ही चाचणी करताना आधारकार्ड सक्तीचे आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. गेल्या वर्षभरात लॉकडाऊन आल्याने अनेकांना आधारकार्ड काढणे शक्य झाले नाही. कुटुंबात जन्मलेल्याकडे आधारकार्ड नाही. अशा संशयित रुग्णांची कोविड चाचणी होत नसल्याने ते सुपर स्प्रेडर होत असून त्यामुळेही रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे भविष्यात सरकारी किंवा खासगी रुग्णालयात जाणाऱ्या अशा संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करताना आधारकार्ड व इतर दस्त सक्तीचे करू नये, अशी मागणी निवेदनात नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी केली आहे.
चाचणीसाठी आधारकार्डाची सक्ती नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 4:14 AM