मानूरसह अभोणा सेंटरला मनुष्यबळाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:15 AM2021-04-20T04:15:25+5:302021-04-20T04:15:25+5:30

जिल्हा प्रशासनाने अभोणा व मानूर कोविड सेंटरला मनुष्यबळ, ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा अधिकचा पुरवठा करून द्यावा, अन्यथा कोविड सेंटरलाच ...

Abhona Center with Manor lacks manpower | मानूरसह अभोणा सेंटरला मनुष्यबळाचा अभाव

मानूरसह अभोणा सेंटरला मनुष्यबळाचा अभाव

Next

जिल्हा प्रशासनाने अभोणा व मानूर कोविड सेंटरला मनुष्यबळ, ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा अधिकचा पुरवठा करून द्यावा, अन्यथा कोविड सेंटरलाच कुलूप ठोकू, असा इशारा आमदार नितीन पवार यांनी दिला आहे.

मानूर कोविड सेंटरला आमदार पवार यांनी भेट देऊन उपाययोजनांसंदर्भात तहसीलदार बी. ए. कापसे, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरदचंद्र परदेशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण यांच्याशी चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या. तालुक्यात जास्त रुग्ण आढळलेल्या गावांतील सर्वांच्याच तातडीने चाचण्या कराव्यात, संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. आरोग्य यंत्रणेने स्वत:हून लोकांपर्यंत जाऊन गावांमध्ये चाचणी सुविधा उपलब्ध करून द्यावी. लसीकरण मोहिमेची अधिक व्यापक अंमलबजावणी करण्याची सूचना पवार यांनी यावेळी केली. पवार यांनी कळवण शहरातील खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या यंत्रणेशीही चर्चा करून अडचणी जाणून घेतल्या. खासगी कोविड सेंटर उभारणीसाठी शासकीय पातळीवरील सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन देतानाच ऑक्सिजन व रेमडेसिविर उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करू असेही त्यांनी सांगितले.

फोटो- १९ नितीन पवार

मानूर येथील कोविड सेंटरवर चर्चा करताना आमदार नितीन पवार. समवेत बी. ए. कापसे, राजेंद्र भामरे, डी. एम. बहिरम, डॉ. सुधीर पाटील, डॉ. शरद परदेशी, विकास थोरात.

===Photopath===

190421\19nsk_39_19042021_13.jpg

===Caption===

फोटो- १९ नितीन पवार  मानूर येथील कोविड सेंटर भेटीप्रसंगी चर्चा करताना आमदार नितीन पवार. समवेत बी. ए. कापसे, राजेंद्र भामरे, डी. एम. बहिरम, डॉ. सुधीर पाटील, डॉ. शरद परदेशी,  विकास थोरात. 

Web Title: Abhona Center with Manor lacks manpower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.